पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:34 IST2025-12-02T10:34:32+5:302025-12-02T10:34:52+5:30
पुणे जिल्ह्यातील सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून 8.37% मतदान झाले आहे

पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर
पुणे : राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून 8.37% मतदान झाले आहे. तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषद मतदान टक्केवारी
जुन्नर- ७.१४, राजगुरूनगर - ८.५३, चाकण - १०.२१, आळंदी - १०.८१, शिरूर - ४.५७, दौंड - ५.०४, इंदापूर - ९.७५, जेजुरी - ७.७३, सासवड - १०.२०, भोर - ८.४८ , लोणावळा - ९.६८, तळेगाव दाभाडे - ७.०४
नगरपंचायत मतदान टक्केवारी
मंचर - ११.४९, माळेगाव - ९.५९, वडगाव मावळ - ११.१५