शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

भामा-आसखेडमध्ये ८३ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:01 IST

भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते.

आसखेड  - भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते. पाण्याची पातळी ६६९.०२ मीटर असून, एकूण पाणीसाठा १९४.१४९ दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १८०.६२७ दलघमी आहे. नुकतेच धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. आलेगाव पागापर्यंत पाणी पोहोचल्यावर गुरुवारी रात्री विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.अनेक वर्षांपासून पुनर्वसन व काही प्रश्नांकडे जबाबदरीने लक्ष न देता आणि तातडीने निर्णय न घेतल्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे उशिराने दि. २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता १,१०० क्युसेक्सने, तर १२.२० वाजता १,६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात भामा-आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्यात आले, त्या वेळी १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर, गतवर्षी झालेल्या सुमारे १,२९२ मिलिमीटर पावसामुळे (उशिरापर्यंत पडलेल्या) विहिरी-नाले समाधानकारक भरलेले होते. परंतु, यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन हा धरण प्रशासनापुढील गंभीर प्रश्न आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबर रोजी सोडणे अपेक्षित होते; परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशिर झाला.परंतु, पाणी जरी उशिरा सोडले तरी खेड, शिरूर, दौंडला त्याचा मोठा फायदा होणार आहे.खेड, दौंड, शिरूरला फायदा : नदीकाठच्या गावांची भागली तहानखेड तालुक्यासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना आणि शेतीसह विविध गावांच्या पाणी योजनांना पाणी मिळाले. तर, त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तिन्ही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे. तर, नदीकाठ जवळपासच्या गावांची तहान भागली आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे