पिंपरी चिंचवड मध्ये शनिवारी ८११ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 09:09 PM2021-03-13T21:09:31+5:302021-03-13T21:10:28+5:30

शहरात ८११ नवे रुग्णदिवसभरात ४८७ जण कोरोनामुक्त

811 new patients in the Pimpri Chinchawad | पिंपरी चिंचवड मध्ये शनिवारी ८११ नवे रुग्ण

पिंपरी चिंचवड मध्ये शनिवारी ८११ नवे रुग्ण

googlenewsNext

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शहरात शनिवारी दिवसभरात ८११ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ४८७ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील कोरोना पाॅझिटव्ह रुग्णांची संख्या एक लाख १३ हजार १८१ झाली आहे. त्यात महापालिका हद्दीतील एक लाख चार हजार ८५३ तर महापालिका हद्दीबाहेरील आठ हजार १७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात शनिवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका हद्दीतील दोन तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८७२ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७८९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २८३९ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १७३३ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. १७८६ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २५१७ जणांना घरी सोडण्यात आले. तर १३०९ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १७१ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ५८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात शनिवारी ६४५६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील १३०९ रुग्णालयात तर ५१४७ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तसेच शहरातील आठही प्रभागांमध्ये दररोज रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या ड प्रभागात सर्वाधिक १५२ रुग्ण आहेत. सध्या सर्वात कमी ६७ रुग्ण ग प्रभागात आहेत.

प्रभागनिहाय कारोना रुग्णसंख्या

प्रभाग - रुग्णसंख्या

अ - १२५

ब - १०६

क - १०२

ड - १५२

इ - १११

फ - ६९

ग - ६७

ह - ७९

एकूण - ८११

Web Title: 811 new patients in the Pimpri Chinchawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.