शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

रातोरात कापली विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे; वृक्षप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:04 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपहाटे तीनच्या सुमारास प्रशासनाकडून झाडे तोडण्याची कार्यवाही : विनोद जैनपालिकेने तातडीने खुलासा करुन संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वृक्षतोडीवर आक्षेप नोंदविण्यात आले असताना त्यावर सुनावणी न घेताच झाडे कापण्याच्या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. याविरोधात त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे.  पुणे विद्यापीठ चौक ते औंध मार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी ४३ झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अडीच वर्षांपूर्वी दिला होता. या ४३ झाडांमध्ये वडाच्या झाडांसह अनेक मोठे वृक्ष असल्याने त्याला तीव्र आक्षेप घेण्यात आला. खासदार अनिल शिरोळे यांनीही वृक्षतोड न करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र तरीही रात्रीच्या वेळी कारवाई करून झाडे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे.पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते विनोद जैन यांनी सांगितले, ‘‘पहाटे तीनच्या सुमारास प्रशासनाकडून झाडे तोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. कायद्यात झाडे  रात्री न तोडण्याची तरतूद असताना झाडे तोडली जात आहेत. आम्ही या वृक्षतोडीवर आक्षेप नोंदविला असताना त्यावर सुनावणी न घेताच बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे.’’पहिल्यांदा वृक्षतोडीचा प्रस्ताव दिला तेव्हा या रस्त्यावर बीआरटी केली जाणार असल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र बीआरटी राबविण्यात आलेली नाही. झाडे तोडून रस्ता रुंद न करता मोठे फुटपाथ बांधून रस्ता पुन्हा अरुंदच केला जात आहे. मग मोठी झाडे तोडण्याचा अट्टहास का, अशी विचारणा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेने याप्रकरणी तातडीने खुलासा करून संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांकडून मिळत नाही मदतमहापालिकेकडून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू करण्यात आली. ती थांबविण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली, मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. वृक्षतोड करणार्‍यांकडे कुर्‍हाडी व इतर धारदार शस्त्रे असतात, त्यांना वृक्षतोड करण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास वृक्षप्रेमींच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांची मदत मिळणे आवश्यक असल्याचे विनोद जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठCrimeगुन्हाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका