शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

By निलेश राऊत | Updated: May 18, 2024 17:10 IST

पुणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील साधारणत: १५० कोटी रूपये हे तिसऱ्या हप्प्त्यापोटी वितरित केले जाणार

पुणे : महापालिकेच्या सुमारे सोळा हजार कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांना, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता रोखी मिळणार आहे. येत्या जूनपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. 

महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभाग यांनी याबाबत महापालिकेच्या सर्व खात्यांना, परिमंडळ, क्षेत्रिय कार्यालये, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग प्रमुखांना याबाबत पत्र दिले आहे. प्रत्येकाने आपल्याकडील कर्मचारी व अधिकारी यांना वितरित होणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याच्या रक्कमांचा तपशील बिले २७ मेपर्यंत ऑडिट विभागाकडून तपासून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात याकरिता २५५ कोटी रूपये तरतूद विविध शिर्षकाखाली उपलब्ध आहे. यापैकी साधारणत: १५० कोटी रूपये हे तिसऱ्या हप्प्त्यापोटी वितरित केले जाणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा सह महापालिका आयुक्त उल्का कळसकर यांनी सांगितले. 

दरम्यान महापालिकेतील जे अधिकारी / कर्मचारी १ जानेवारी २०१६ नंतर निवृत्त झाले आहेत. अशा अधिकारी व कर्मचारी व मयतांच्या वारसांना ७ व्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते सेवानिवृत्ती दिनाकांपर्यंत तिसऱ्या हप्त्याची बिले संबंधित खात्यांनी ऑडिट विभागाकडून तपासून घेण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. जून महिन्यात अनेक शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने शैक्षणिक खर्च या महिन्यात मोठा असताे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जूनपर्यंत सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळसकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEducationशिक्षणEmployeeकर्मचारीSocialसामाजिकMONEYपैसा