Independence Day| पुणे महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 11:20 IST2023-08-15T11:20:19+5:302023-08-15T11:20:51+5:30
त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले...

Independence Day| पुणे महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन संपन्न
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन संपन्न करण्यात आला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ८.०५ वाजता आयुक्त विक्रम कुमार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे, विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.