शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

नीरा खोऱ्यातील धरणांत ७६ टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा पाणीसाठा सरासरी १४ टक्क्यांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:39 IST

या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भरत निगडे

नीरा : नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने व परतीचा पावसानेही दमदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहत होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १४ टक्क्यांपेक्षा पाणीसाठा अधिकचा असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चारही धरणात एकूण ३६ हजार ९०१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७६.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३० हजार ४०६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यावर्षी मे महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

यावर्षी नीरा खोऱ्यातील या चार धरणात आज, बुधवारी (दि. २२) ७६.३५ टक्के पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना उन्हाळी आवर्तन नियमित मिळणार असल्याची माहिती समजते.

बुधवारी (दि. २२) नीरा खोऱ्यातील नीरा - देवघर धरणात ९,०५२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७७.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ६,६६२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५६.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर धरणामध्ये १९,६५३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ८३.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १५,४१३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६५.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. वीर धरणामध्ये ४,९९८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच ५३.१३ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.गतवर्षी ५,२७४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५६.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गुंजवणी धरणामध्ये ३,१९८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८६.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३,०५७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८२.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षापेक्षा आकडेवारीवरून समाधानकारक असल्याचे समोर येत आहे.

तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ विसर्ग

२०२३ च्या पावसाळी हंगामात नीरा खोऱ्यात सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे धरणे शंभर टक्के भरलीच नव्हती. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला नव्हता. आता या वर्षी २०२३ च्या पावसाळी हंगामात सरासरी इतका तर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. सर्व धरणांतून तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ विसर्ग सुरू होता. ४८ टीएमसी क्षमतेच्या नीरा खोऱ्यातील चार धरणातून तब्बल ६० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.

रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू

नीरा खोऱ्यातील पाणीसाठ्यावर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरससह इतर भागातील शेतकरऱ्यांना वरदान असलेल्या वीर धरणावरील दोन्ही कालव्यांतून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. बुधवारी नीरा उजव्या कालव्यातून १,२९९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र