शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

डेक्कन कॉलेजच्या हेरिटेज वास्तुसाठी ७५ लाख देण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:52 PM

पुणे शहरात एकूण २५१ हेरिटेज वास्तू आहे...

ठळक मुद्देडेक्कन कॉलेज संस्था १८६४ साधी बांधण्यात आली असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना

पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धन करण्यास  महापौर निधीतून ७५ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ऐतिहासिक शैक्षणिक वास्तूचे जतन संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यास एक महत्त्वपूर्ण इतिहास उत्तम प्रकारे जतन होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सांगितले.      पुणे शहरात एकूण २५१ हेरिटेज वास्तू आहे. पालिकेच्या मालकीच्या ताब्यात असलेल्या हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धनाचे काम पुणे  पालिकेच्या वतीने केले जाते .  डेक्कन कॉलेज पुणे पालिकेच्या ग्रेड वन यादीत समाविष्ट आहे. ही संस्था १८६४ साधी बांधण्यात आली असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्र, संस्कृत मराठा इतिहास ,प्राचीन भाषाशास्त्र या विषयात मूलभूत संशोधन कार्य केले जाते . पुरातत्व शास्त्र व भाषाशास्त्र या विषयांमध्ये एम.ए आणि पीएचडीचे अध्यापन केले जाते . या प्रकारे शिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे .या संस्थेमध्ये पुरातत्त्व विषयावर संशोधन करण्यासाठी देश आणि विदेशात विद्याथ्यार्ने संशोधक येत असतात . या संस्थेच्या हेरिटेज इमारतीची पडझड झालेली असून रुफचे पत्रे खराब झाले आहेत.  पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन रुफ खालील लाकडे मोठ्या प्रमाणावर सडली आहेत. या वास्तूच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात ओल आली आहे.  कलाकुसरीचे लाकूड काम खराब झालेले आहे .पॅसेजमधील दगडी पेव्हीग खचलेले आहे. पावसाळी पन्हाळी नादुरुस्त झालेल्या आहेत. ब्रिटिश कालीन   कलाकुसरीच्या खिडक्या च्या काचा फुटलेल्या आहेत . दगडी बांधकामाचे लाईम पॉईटीग उखडलेले असुन  ब-याच ठिकाणी दगड निसटलेले आहेत.त्यामुळे या वास्तूचे जतन संवर्धन साधारणपणे साडेतीन कोटींची आवश्यकता आहे.  महापौर मुक्ता टिळक यांनी २०१७ -१८च्या महापौर निधीतून या कामास ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला होता . मात्र अदयापही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरिटेज वास्तूंचे जतन संवर्धन करण्यास  महापौर निधीतून ७५ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे, असे सुनिल कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDeccan Collegeडेक्कन कॉलेजMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका