शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेले ७४ विद्यार्थी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 19:10 IST

कोटा येथे विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४ विद्यार्थी अडकले होते.

ठळक मुद्देबस आल्यानंतर आठ बस चालकांसह सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंगविद्यार्थ्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून पाठविण्यात आले घरी

पुणे : लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेले ७४ विद्यार्थी शुक्रवारी (दि. १) रात्री सुखरुपपणे पुण्यात परतले. स्वारगेट येथील बसस्थानकात चार बसमधून हे विद्यार्थी आले. त्यांची आरोग्य तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले.कोटा येथे विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४ विद्यार्थी अडकले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना घरी परतणे शक्य होत नव्हते. त्यांना परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून एसटी महामंडळाच्या ७२ बस पाठविण्यात आल्या होत्या. गुरूवारी या बस विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्राकडे रवाना झाल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७४ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना घेऊन शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पहिली बस स्वारगेट बसस्थानकात आली. त्यानंतर काही वेळेच्या अंतराने रात्री साडे बारा वाजेपर्यंत तीन बस आल्या. बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले होते. तसेच स्थानकात बस येण्यापुर्वीच विद्यार्थ्यांच्या तपासणीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. बस आल्यानंतर आठ बस चालकांसह सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घरी पाठविण्यात आले.  एसटीच्या पुणे विभाग वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी म्हणाल्या, विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांच्या पालकांना आधीच बसस्थानका येण्याचे निरोप देण्यात आले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचे पालक आले होते. केवळ तीन-चार विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थी पुण्यातीलच होते.-------------------पुण्यात अडकलेले विद्यार्थी, मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. राज्यातील लोकांना एसटीमार्फत पोहचविले जाण्याची शक्यता आहे. तर परराज्यातील लोकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. मात्र, अद्याप याबाबत एसटी किंवा रेल्वे प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.--------------- 

टॅग्स :PuneपुणेSwargateस्वारगेटCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajasthanराजस्थान