शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दोन लाखांच्या गाडीला ७० हजार भाडे!, कॅन्टोन्मेंटमधील प्रकार; माहिती अधिकारातून बाब उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:31 PM

कॅन्टोन्मेंट भागातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी पुणे छावणी परिषद एका गाडीमागे तब्बल ६९ हजार ५८७ रुपयांचे भाडे अदा करीत आहे. एका गाडीचे बाजारमूल्य हे पावणेतीन लाख रुपयांच्या घरात आहे. 

पुणे : कॅन्टोन्मेंट भागातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी पुणे छावणी परिषद (पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड) एका गाडीमागे तब्बल ६९ हजार ५८७ रुपयांचे भाडे अदा करीत आहे. अशा पंधरा गाड्यांपोटी दरमहा १० लाख ४३ हजार ८०५ रुपये कंत्राटदाराला देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे एका गाडीचे बाजारमूल्य हे पावणेतीन लाख रुपयांच्या घरात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने छावणी परिसरातील घरातून कचरा गोळा करण्यासाठी १५ गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. संबंधित कंत्राटदाराबरोबर २०११ ते २०१७ असा करार करण्यात आला आहे. या गाडीवर वाहकाची नेमणूक करताना चारित्र्य पडताळणी दाखला आवश्यक असतो. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून गाडी सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र देखील संबंधिताला घ्यावे लागले. एका कचरागाडीला भाड्यापोटी तिच्या किंमतीच्या तब्बल ३५ टक्के रक्कम कॅन्टोन्मेंट बोर्ड अदा करीत आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदार सेवा करारनाम्याप्रमाणे पुरवितो की नाही, याची तपासणी करण्याचे भान देखील दाखविले नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकारात घंडागाडीवर असणार्‍या चालकाचा चारित्र्य पडताळणी दाखला आणि वाहन परवान्याची प्रत मागितली असता, ती घेण्यासाठी ठेकेदाराकडे संपर्क साधावा असे भयंकर उत्तर यात देण्यात आले आहे. आपटीओ पासिंगबाबतही तसेच उत्तर देण्यात आले आहे. पुणे छावणी परिषदेचे मुख्य आरोग्य निरीक्षक एस. डी. झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कवडे यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे. कवडे म्हणाले, २ लाख रुपये किंमतीच्या गाडीसाठी जवळपास ७० हजार रुपये दरमहा भाडे देण्यात येत आहे. ही बाब विसंगत आहे. जी गाडी रस्त्यावरुन धावणार आहे, ती चालविण्यास योग्य आहे, की नाही याची देखील माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे नाही. या सर्व प्रकारात संबंधित ठेकेदाराने कराराचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा. 

टॅग्स :Puneपुणे