लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 23:15 IST2018-10-20T23:15:01+5:302018-10-20T23:15:28+5:30
पुण्यामधील घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
पुणे - घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. नशरा रेहमान खान (वय ७, रा़ क्लास गार्डन सोसायटी, घोरपडी पेठ) असे या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नशरा खान ही मुलगी आपल्या आजीच्या घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स येथे आली होती. तिची आजी तिसºया मजल्यावर राहते. ती नानकटाई आणण्यासाठी खाली गेली होती. नानकटाई घेऊन ती पुन्हा लिफ्टने तिसºया मजल्यावर येत होती. पण लिफ्ट तिसºया मजल्यावर न थांबल्याने ती घाबरली. त्यामुळे तिने लिफ्ट पहिला दरवाजा उघडला. तिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला़ परंतु, ती तिसºया व चौथ्या मजल्याच्या मध्ये अडकली. तिचा आरडाओरडा ऐकून घरातील लोक धावत बाहेर आले तर ती लिफ्टमध्ये अडकलेली आढळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला तात्काळ बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या नशराला रुग्णालयात नेल. परंतु, त्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता.