Pune: वारजे ठाण्यातील दोघा निरीक्षकांसह ७ पोलिस निलंबित; गोळीबार, वाहन तोडफोड भोवली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 09:39 PM2023-07-01T21:39:18+5:302023-07-01T21:40:01+5:30

तीन दिवसांत निलंबनाची माेठी कारवाई...

7 policemen suspended including two inspectors from Warje thana | Pune: वारजे ठाण्यातील दोघा निरीक्षकांसह ७ पोलिस निलंबित; गोळीबार, वाहन तोडफोड भोवली

Pune: वारजे ठाण्यातील दोघा निरीक्षकांसह ७ पोलिस निलंबित; गोळीबार, वाहन तोडफोड भोवली

googlenewsNext

पुणे : वारजे ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके, गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्यासह तीन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचारी अशा सात जणांना एकाच दिवशी तडकाफडकी निलंबन केले आहे. पोलिस आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तीन दिवसांत निलंबनाची दुसरी मोठी कारवाई केली आहे.

पोलिस निरीक्षक दगडू हाके, दत्ताराम बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, यशवंत पडवळे, जनार्दन होळकर, पोलिस कर्मचारी सचिन कुदळे, अमोल भिसे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून वारजे परिसरात गुन्हेगारांनी चांगलाच धुडगूस घातला आहे.

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केलेला गोळीबार आणि त्यानंतर सराईत गन्हेगार पपुल्या वाघमारे व त्याच्या साथीदाराने वाहनांची तोडफोड करत घातलेला राडा हे दोन्ही प्रकार निलंबन केलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोवल्याचे दिसून येते आहे. तोडफोडीच्या घटनांचे पडसाद उमटल्यानंतर, पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले होते, तसेच गृहविभागानेही या सर्व घटनांचा सविस्तर अहवाल मागितला होता.

पपुल्या वाघमारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, वरील सर्वांनी मोक्का कारवाईबाबत कोणत्याही प्रकारची सकारात्मकता दाखविली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत दिसून आले आहे. त्यामुळे जर वेळीच पपुल्या याच्यावर कारवाई केली असती, तर तोडफोडीची घटना टाळता आली असती, त्याचाच ठपका ठेवत, सर्वांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक, गुन्हे निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचारी अशा सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

Web Title: 7 policemen suspended including two inspectors from Warje thana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.