पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:16 PM2020-04-29T16:16:30+5:302020-04-29T16:23:47+5:30

जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार

65,000 citizens will get food grains Under Sharad Bhojan Yojana in pune district | पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

googlenewsNext
ठळक मुद्देयोजनेचा तिसरा टप्पा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणार वाटपखेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार

पुणे : संचाबंदीमुळे वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर मातांना दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी कागदपत्रे नसणा-यांना देखील अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्ह्यातील असे गरजु लाभार्भी निश्चित करण्यात आले असून शरद भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहिर झाले. यामुळे अनेक कामगार राज्यात अडकुन पडले. काम बंद  पडल्याने तसेच जवळ पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होत होती.  अशापैकी त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु ते त्यांच्या जिल्ह्याचे असल्याने त्यांना त्याद्वारे जिल्ह्यात लाभ मिळत नव्हता. त्यासाठी कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणा-या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या साठी जिल्ह्यात आठ दिवस सर्वेक्षण करण्यात आले. त्या द्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तर  काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक आहे, असे असले तरी काही काळासाटी हे सर्वेक्षण थांबवून, मंगळवार (दि.२८) पर्यंत घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
.................
खेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी आहेत. शिरूरमध्ये ४ हजार १२४ कुटुबांतील ११ हजार २६० नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर नगपालिका हद्दीमध्ये सर्वाधिक जेजुरी नगरपालिका हद्दीमध्ये ६१६ कुटांबातील १ हजार ११३ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात ४ हजार १७ कुटुबांतील ११ हजार १३८ नागरिकांना, हवेलीमधील ३ हजार ४८४ कुटुबांतील ९ हजार २१० नागरिकांना, दौंडमधील १  हजार ८३१ कुटुबांतील ५ हजार ३०७ नागरिकांना, पुरंदरमधील १ हजार ५२१ कुटुबांतील ३ हजार ८८९ नागरिकांना, भोरमधील १ हजार ४९६ कुटुबांतील ४ हजार १०२ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार आहेत.
...............................
शरद भोजन योजना गरजुंसाठी लाभाची ठरत आहे. या योजनेच्या तिसरा टप्यात लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून करण्यात येणार आहे.  प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदुळ देण्यात येणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना केलेल्या आहेत.
- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद
--------------------------

Read in English

Web Title: 65,000 citizens will get food grains Under Sharad Bhojan Yojana in pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.