शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गणेशोत्सवात ६५० जादा बसेस भाविकांच्या सेवेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 20:49 IST

गणेशोत्सवादरम्यान उपनगर तसेच बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या खुप असते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते.

ठळक मुद्दे १३ ते २३ सप्टेंबरदरम्यान रात्री दहानंतरच्या सर्व बसेस यात्रा स्पेशल रात्री १ वाजेपर्यंत यात्रा बस संचलनात राहणार

पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून सुमारे ६५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते २३ सप्टेंबरदरम्यान रात्री दहानंतरच्या सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून धावतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.गणेशोत्सवादरम्यान उपनगर तसेच बाहेरगावाहून शहरात येणाºया गणेशभक्तांची संख्या खुप असते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते. या भाविकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात दि. १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान १७० तर दुसऱ्या टप्प्यात दि. १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार ६४९ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री दहानंतर धावणाऱ्या यात्रा स्पेशल बसेसला पाच रुपये जादा तिकीट दर असेल. तसेच पासधारकांना केवळ रात्री बारापर्यंतच पासवर प्रवास करता येईल. रात्री १ वाजेपर्यंत यात्रा बस संचलनात राहतील. त्यानंतर कुठलाही चालणार नाही. शहराच्या मध्य भागातील रस्ते सायंकाळी बंद केले जातात, त्यामुळे या मार्गावरील बस पयार्यी मागार्ने सुरू राहतील, असे प्रशासनाने कळविले आहे.------------------गणेशोत्सवात रात्रीच्यावेळी सोडण्यात येणाऱ्या बसस्थानक                                शेवटचे ठिकाण१. स्वारगेट बसस्थानक-      धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव, अप्पर इंदिरानगर, सुखसागरनगर, मार्केटयार्ड, पुणे स्टेशन, सांगवी,आळंदी२. नटराज हॉटेल-                  वडगाव, धायरी, सिंहगड, खानापुर३. स्वारगेट डेपो स्थानक-    हडपसर, कोंढवा४. महात्मा गांधी स्थानक-    कोंढवा खुर्द, कोंढवा बुर्दुक, साळुंके विहार५. हडपसर गाडीतळ-    स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, उरूळी कांचन, मांजरी, थेऊर, वडकी गाव, फुरसुंगी, देवाची उरूळी.६. ससुन रोड -       विश्रांतवाडी, धानोरी, विद्यानगर, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.७. डेंगळे पुल -       लोहगाव, वडगाव शेरी, मुंढवा गाव, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगाव ढमढेरे, हडपसर. ८. मनपा भवन-    भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगाव, विश्रांतवाडी, विद्यानगर, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे                                  गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, प्राधिकरण, खडकी बाजार.

९. काँग्रेस भवन-                कर्वेनगर, माळवाडी, कोंढवागेट, कोथरूड डेपो१०. डेक्कन जिमखाना-    कर्वेनगर, माळवाडी, कोंढवा गेट, गोखले नगर, कोथरुड डेपो.११. मनपा नदीकाठ-        बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, अभिनव१२. कात्रज, धनकवडी,    स्वारगेट, अप्पर डेपो        १३. निगडी, भोसरी,    मनपा भवनचिंचवड गाव(दि. १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी या मार्गावर रात्री जादा बसेस सोडण्यात येतील.)

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव