सौर ऊर्जेच्या माध्यमातून ६२ हजार युनिट वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:17 PM2019-06-25T13:17:33+5:302019-06-25T15:15:41+5:30

अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील एका सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे.

62 thousand units of electric power from Solar energy | सौर ऊर्जेच्या माध्यमातून ६२ हजार युनिट वीजनिर्मिती

सौर ऊर्जेच्या माध्यमातून ६२ हजार युनिट वीजनिर्मिती

Next
ठळक मुद्देअँबियन्स अँटिलीया सोसायटीचा प्रकल्प 

पुणे : स्मार्ट सिटी या योजनेला साजेशी अशी अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधील ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना बावधन येथील अँबियन्स अँटिलीया या सोसायटीने प्रत्यक्षात उतरवली आहे. या सोसायटीतील सभासदांच्या सहकायार्ने आर्थिक बाजूवर मात करत महिन्याला ५ हजार १०० युनिट वीज निर्मिती करणारा ४१.३ किलोवॅट क्षमतेचा आधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प इमारतीवर बसविण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन  नुकतेचउपनिबंधक सहकारी संस्था चे दिग्विजय राठोड यांच्या हस्ते झाले.  नगरसेवक दिलीप वेडे, नगरसेविका अल्पना वरपे, चेअरमन संजय चौधरी, सेक्रेटरी गिरीश काळे, कमिटी सदस्य दीपक हर्डीकर आणि सोसायटी सभासद यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. महावितरण कडून सोसायटीची लागणारी वीज दिलेल्या विजेच्या युनिट मधून वजा करून उर्वरित बिल सोसायटी भरणार आहे. या माध्यमातून सोसायटीच्या वीजबिलात वषार्ला सुमारे १० लाख रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पामध्ये व्दिनपीक या आधुनिक कॅनडियन सोलर पॅनलचा वापर केला आहे. त्याची क्षमता साधारण १८ टक्के एवढी आहे. या तंत्रज्ञानामुळे जरी सोलर वरती धूळ किंवासावली पडली तरी संपूर्ण प्लेट बंद न पडत उर्वरित प्लेट ऊर्जा निर्मिती करत राहते. तसेच भारतीय हवामानाची क्षमता (इफिशिअन्सी) लक्षात घेऊन म्हणजेच कितीही जोराचे वारे किंवा वादळ आले तरी ऊर्जा निर्मिती सुरूच राहील. या सोलर पॅनल ला इंटरनेटशी जोडल्याने दिवसभरात किती वीज निर्माण,  झाली किंवा आत्तापर्यंत किती निर्माण झाली हे पाहणे शक्य होणार आहे. असे दिपक हर्डीकर यांनी सांगितले या वेळी राठोड यांनी हा प्रकल्प राबविल्या बद्दल सर्व पदाधिकारी व सभासदाचे कौतुक केले. आणि इतर स?सायट्यानी या प्रकल्पाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.  
हर्डीकर म्हणले कि अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा वापरून उभारण्यात आलेला हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पास एकूण २२ लाख रुपये एवढा खर्च आला असून सर्व सभासदांनी एकत्र येत ४ महिन्यात हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचा ५ वषार्चा देखभाल खर्च देखील खरेदी किमतीत असल्याने सोसायटीला त्याचा कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही.  

चौकट-
 हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानउक्त असून याच्या माध्यमातून  वर्षभरात जवळपास ५१ टन कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचणार आहे. जर आंब्याचा झाडाचा विचार केला तर सुमारे ५ हजार शंभर झाडांमुळे एवढे कार्बन उत्सर्जन रोखू शकते ते या एका प्रकल्पाच्या माध्यमातून रोखणे शक्य होणार आहे  झाला .
..........
...............गटाचा संबंध नाही.

Web Title: 62 thousand units of electric power from Solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.