शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

जिथे कुंपणच खाते शेत..! एसआरपीएफच्या अधिकाऱ्याकडून ६२ लाखांचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 1:30 PM

एसआरपीएफच्या कॅन्टीनमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून सुरू होता गैरव्यवहार एसआरपीएफच्या अधिकाऱ्याने ६२ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी अहवालातून समोर

पुणे : जिथे कुंपणच शेत खाते अशा ठिकाणी कुणी कुणाला दोष द्यायचा. अशी परिस्थिती सध्या एसआरपीएफच्या खात्यातील गैरव्यवहारावरुन पुढे आली आहे. एसआरपीएफच्या कॅन्टीनमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली आहे. सबसीडी कॅन्टीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अपहारबाबत संशय आल्यानंतर त्या गैरव्यवहाराची एका समितीमार्फत चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला आहे. एसआरपीएफच्या अधिकाऱ्याने ६२ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 चे सहायक पोलीस उपनिरीक्षक रणजित जगन्नाथ जाधव यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी याबाबत राज्य राखीव पोलीस बल गट क्र1 चे पोलीस कल्याण अधिकारी रमेश वेठेकर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 च्या कँन्टीनमध्ये घडली. फिर्यादी हे पोलीस निरीक्षक म्हणून राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी याठिकाणी पोलीस कल्याणकार अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांना एसआरपीएफ ग्रुप 1 मधील सबसीडी  कॅन्टीन मध्ये काही रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आला. त्यांनी कॅन्टीनची तपासणी केल्यानंतर रकमेमध्ये आलेल्या तफावतीवरुन त्यांचा संशय बळावला. त्यांनी ही बाब राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुण्याचे समादेशक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या गैरव्यवहाराचा तपास करण्याकरिता एक चौकशी समिती स्थापन केली. त्या चौकशी समितीने सबसीडी कॅन्टीनमध्ये 60 लाख 98 हजार 956 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.बी.जगताप हे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस