शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर बँकेसाठी ६० टक्के मतदान

By admin | Updated: May 18, 2015 05:32 IST

उत्तर पुणे जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेसाठी आज १७ संचालक निवडून देण्यासाठी ४१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले

दावडी : उत्तर पुणे जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेसाठी आज १७ संचालक निवडून देण्यासाठी ४१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सरासरी ६०़३४ टक्के मतदान झाले आहे़ असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी दिली. उद्या सोमवारी १८ रोजी राजगुरुनगर येथे रिद्धी सिद्दी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या एकूण १७ जागांसाठी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. बँकेच्या एकूण १९ हजार ७८५ मतदारांपैकी ११ हजार ९३९ मतदार सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. बँकेच्या कार्यक्षेत्रात पुणे, भोसरी, म्हाळुंगे, चाकण, राजगुरुनगर, कडूस, आळेफाटा, नारायणगाव, देहूरोड, मंचर, आळंदी, शिरूर या ठिकाणी मतदान घेण्यात आले. चाकण आणि राजगुरुनगर या दोन केंद्रावर जास्त सभासद मतदार असल्याने येथे मतदान केंद्रांची संख्या जास्त होती. मतदारांनी सकाळपासून मतदान करण्यासाठी गर्दीकेली होती. मतदानासाठी ज्या शाखेचे सभासद आहेत, त्याच शाखेच्या नजीक असलेल्या केंद्रांवर मतदान करण्याची सोय केल्याने बाहेरगावच्या सभासद मतदारांचे हाल झाले.बँकेने यावेळी सभासद क्रमांकानुसार मतदान प्रक्रिया न घेता अनुक्रमांकानुसार घेतल्याने मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना धावपळ करावी लागली. बँकेचे अनेक मतदार हे कामगार असल्याने ते मतदानासाठी येण्यास मोठा उशीर लागला. मतदानाची वेळ सकाळी ८ ते ५ अशी असताना उमेदवारांनी प्रचार करताना ही वेळ सात ते साडेपाच सांगितल्याने अनेक कामगार मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. राजगुरुनगर व चाकण केंद्रावर दुपारी ४ ते ५ या कालावधीत जास्त कामगार सभासद मतदानासाठी आले होते. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीतील १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १७ विद्यमान संचालकांचा समावेश आहे. या निवडणुकीत सहकार आणि भीमाशंकर ही दोन पॅनेल उभी करण्यात आली होती. भीमाशंकर पॅनेलमध्ये ११ उमेदवार होते तर इतर उमेदवारांनी स्वबळावर निवडणूक लढविली आहे. एकंदरीत निवडणूक शांततेत होण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सर्वांत जास्त गर्दी राजगुरुनगर केंद्रावर होती. उद्या सोमवारी राजगुरुनगर येथे मतमोजणी होणार आहे. (वार्ताहर)