Pune Rain| डिंभे धरणातून विसर्ग वाढला, पाण्याच्या प्रवाहात आमडे गावातील व्यक्ती गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:09 IST2022-09-16T13:06:27+5:302022-09-16T13:09:47+5:30
डिंभे ( पुणे ): आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात जवळपास २५ हजार क्युसेक्सने पाण्याची ...

Pune Rain| डिंभे धरणातून विसर्ग वाढला, पाण्याच्या प्रवाहात आमडे गावातील व्यक्ती गेला वाहून
डिंभे (पुणे): आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात जवळपास २५ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक होत असल्याचे आज ११.३० वाजता धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून सुमारे २० कुसेक्सने पाणी घोडनदी पात्रात सोडण्यात येत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आमडे या गावातील चंद्रकांत काळू असवले ही व्यक्ती (वय ४८ वर्षे) डिंभे धरणात वाहून आली आहे. स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीस वाचविण्यासाठी होडीतून पाठलाग केला मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने ती हाती लागू शकली नाही. पाणलोट आडिवरे गावापर्यंत ही व्यक्ती वाहून आली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान प्रशासनाच्यावतीने धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना व घोडनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मासेमारी अथवा कोणत्या कामासाठी नदी पात्रात उतरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.