मिनी डंपरची ५५ वर्षीय महिलेला धडक; हडपसरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:07 IST2023-10-05T13:06:37+5:302023-10-05T13:07:13+5:30
महिलेवर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

मिनी डंपरची ५५ वर्षीय महिलेला धडक; हडपसरमधील घटना
हडपसर: हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंत्री मार्केट समोर मिनी डंपरने ५५ वर्षीय महिलेला दिलेल्या धडकेत जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ०५) सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी ,उषा सतीश चौधरी (वय – ५५, रा. – फुरसुंगी) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार डंपर चालकाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास उषा चौधरी या मंत्री मार्केट या ठिकाणी थांबल्या होत्या. यावेळी वाघोली ते महंमदवाडी जाणाऱ्या एका मिनी डंपरने चौधरी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चौधरी या जखमी झाल्या. दरम्यान, चौधरी यांच्यावर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी हडपसर पोलीस दाखल झाले असून तपास पोलीस करीत आहेत.