५५ वर्षाच्या पुरुषाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:03 IST2018-04-30T22:03:15+5:302018-04-30T22:03:15+5:30

ढाकाळे (ता.आंबेगाव) येथे एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षाच्या पुरूषाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

A 55-year-old man sexual harrashment with a minor girl | ५५ वर्षाच्या पुरुषाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

५५ वर्षाच्या पुरुषाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

घोडेगाव   :-   ढाकाळे (ता.आंबेगाव) येथे एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षाच्या पुरूषाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी लक्ष्मण रामभाऊ  काळे याला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. ३० एप्रिल ) सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी लक्ष्मण काळे याने पीडित अल्पवयीन मुलीला गोडबोलून शेतातील पिंपळाच्या झाडाखाली झुडपाच्या आडोशाला नेत तिच्या बरोबर अश्लिल चाळे करत होता. हे करताना पीडित मुलींच्या मावस भावाने पाहिले. त्यानंतर त्याने त्याच्या तावडीतून मुलगी सोडवली व घोडेगाव पोलिस ठाण्यात योगेश गोविंद डामसे याने फिर्यादी दिली आहे. मुलगी अल्पवयीन व हिंदु महादेव कोळी या जमातीची आहे हे माहित असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत. 

Web Title: A 55-year-old man sexual harrashment with a minor girl