खेड तहसिलदार कार्यालयात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:53 PM2020-03-16T18:53:20+5:302020-03-16T18:53:57+5:30

सातत्याने पाठपुरावा करुनही न्याय मिळत नाही..म्हणून उचलले उचलले पाऊल

55 year-old farmer tried suicide in the Khed Tehsildar office | खेड तहसिलदार कार्यालयात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

खेड तहसिलदार कार्यालयात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

राजगुरुनगर: वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नाही म्हणून खेड तहसिल कार्यालयात तहसिलदारांसमोर ५५ वर्षीय शेतकऱ्यानी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान विठ्ठल गुळाणकर. ( रा. गुळणी ता खेड ) असे विषारी औषध करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
 गुळाणी( ता. खेड )येथील येथील विठ्ठल गुळाणकर यांच्या मालकी जागेत ज्ञानेश्वर शांताराम रोडे व शांताराम मारुती रोडे यांनी अतिक्रमण केले . हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत ,पोलीस स्टेशन, पंचायत समिती खेड व महसूल विभाग या विभागाकडे तक्रारी अर्ज केले होते. गेले आठ महिने गुळाणकर संबधित कार्यालयात हेलपाटे मारत होते. कुठलीही कारवाई न झाल्यामुळे तसेच न्याय न मिळाल्यामुळे त्रासुन आज (दि. १६ रोजी ) साडेबाराच्या सुमारास तहसीलदार कचेरीत जाऊन तहसीलदार सुचित्रा आमले यांच्यासमोर कागदपत्रे टाकून खिशात आणलेली विषारी औषधाची बाटली तोंडाला लावली. दरम्यान, गुळाणकर हे जागीच कोसळले. सपकाळ पोलिसांनी पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
    
 

Web Title: 55 year-old farmer tried suicide in the Khed Tehsildar office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.