पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड;१२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:25 IST2025-07-16T10:24:32+5:302025-07-16T10:25:18+5:30

स्पर्धेचे अर्जवाटप दि. १४ व १५ रोजी संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात करण्यात आले. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या १० संघांना वगळून ४१ पैकी ३९ संघांना थेट प्रवेश देण्यात आला.

51 teams selected for Purushottam Karandak One-Act Competition; 12 teams selected through lottery | पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड;१२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड;१२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे

पुणे : हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. १५) ५१ संघांची निवड निश्चित करण्यात आली आहे. १२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे.

स्पर्धेचे अर्जवाटप दि. १४ व १५ रोजी संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात करण्यात आले. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या १० संघांना वगळून ४१ पैकी ३९ संघांना थेट प्रवेश देण्यात आला. गेल्यावर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या २ संघांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित नव्हते. प्रतीक्षा यादीत असलेल्या २१ संघांमधून १२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली.

अर्जांची स्वीकृती दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळात ४१८, नातूवाडा, शनिवार पेठ येथे होणार आहे. आतापर्यंत ज्या संघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी कुणी या दिवशी गैरहजर राहिल्यास इतर संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी निवडलेले १२ महाविद्यालयीन संघ

पी. व्ही. पीआयटी, बावधन, सिंहगड अकॅडमीचे इंजिनिअरिंग कॉलेज, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज, डी. ई. एस. पुणे युनिर्व्हसिटी, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे फाइन आर्टस् कॉलेज, जयवंतराव सावंत इंजिनिअरिंग कॉलेज, अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालय. 

Web Title: 51 teams selected for Purushottam Karandak One-Act Competition; 12 teams selected through lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.