शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

शिवराज्याभिषेक दिनाला शनिवारवाड्यावर उभारणार ५१ फुट स्वराज्यगुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:18 PM

श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभी राहणार आहे.

ठळक मुद्देनामांकित ढोलताशा पथके, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर होणार

पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी ५१ फूट उंच स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यात येणार आहे. शनिवारवाडयाच्या प्रांगणात तब्बल ३५१ ढोल-ताशांच्या निनादात हा सोहळा होणार आहे. महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, चित्रपट कलाकार, सरदार, सुभेदार, मावळ्यांच्या वंशजांच्या शुभहस्ते स्वराज्यगुढीचे पूजन होणार आहे , अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभी राहणार आहे. याप्रसंगी शिवगर्जना, सह्याद्रीगर्जना, जय शिवराय, आम्ही नुमवीय, नादब्रह्म ट्रस्ट ,रुद्रगर्जना, गुरुजी, शिवनेरी, ही पुण्यातील नामांकित ढोलताशा पथके वादनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाडातर्फे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर होणार आहे. श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते होणार आहे. यावर्षी समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध संघटना, संस्थांच्या मार्फत दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, संभाजी महाराज पुतळा डेक्कन, नरवीर तानाजी मालुसरे चौक कोंढवा, चंद्रमौलेश्वर मंदिर हडपसर, वारजे चौक, नळस्टॉप चौक, १५ आॅगस्ट चौक, शिवणे गाव, नांदेड गाव, वीर बाजी पासलकर स्मारक, खेड-शिवापूर अशा असंख्य ठिकाणी चौकाचौकात, गावागावात स्वराज्यगुढी उभारत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. समितीच्या वतीने दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे साजरा होणा-या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रणवाद्य, सह्याद्रीगर्जना ही नामांकित ढोलताशा पथकेही मानवंदना देणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेShaniwar WadaशनिवारवाडाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMukta Tilakमुक्ता टिळक