तलवारीच्या धाकाने ५० हजार रुपये खंडणीची मागणी; उरुळी देवाची परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 14:19 IST2023-08-29T14:19:01+5:302023-08-29T14:19:38+5:30
५० हजार रुपयांची खंडणी मागून पैसे दिले नाही तर तलवारीने उभे चिरण्याची धमकी दिल्याची घटना उरुळी ..

तलवारीच्या धाकाने ५० हजार रुपये खंडणीची मागणी; उरुळी देवाची परिसरातील घटना
लोणी काळभोर (पुणे) : खासगी पाइपलाइन दुरुस्तीचे काम करणाऱ्यास काम सुरु ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागून पैसे दिले नाही तर तलवारीने उभे चिरण्याची धमकी दिल्याची घटना उरुळी देवाची (ता. हवेली) येथे घडली.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सनी मोहन शेवाळे (वय २५, रा. उरुळी देवाची, हवेली) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार प्रसाद भाडळे व आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल रत्नाकर वाजे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार सनी शेवाळेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.