शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:18 IST

धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असून ५० लोकांचे जीव हातात, काही वाईट झाले तर, यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता

उजमा शेख

पुणे: जेव्हा २०१९ बॅचमध्ये महिला एसटी चालक म्हणून निवड झाली. तेव्हा धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असल्यामुळे तसेच ५० लोकांचे जीव हातात, काही बो-वाईट झाले तर यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता, परंतु एसटी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते, त्यामुळे हळूहळू घरच्यांचा विश्वास बसू लागला, असे महिला एसटीचालक शीतल शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी लोकांची पहिली पसंती असते ती लाल परीची, त्याचे स्टेअरिंग आता अवघ्या २६ वर्षीय शीतल शिंदे यांच्या हाती आले आहे. बारावीत एअर होस्टेज म्हणून निवड झाली. त्या एमसीए पदवीधारक असून, त्यांनी खाजगी बँकेत नोकरी केली. पण कोणत्याही नोकरीत त्यांना समाधान मिळाले नाही; त्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या. त्याच काळात त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात बघितली. त्यानुसार सर्व प्रक्रिया सुरू केल्या. २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पात्रता चाचणीत उत्तीर्ण होऊन २६ वर्षी शीतल शिंदेच्या हाती आले लाल परीचे स्टेअरिंग. जिद्द, चिकाटी, प्रयत्न त्याला संघर्षाची जोड देऊन महिला कोणत्याही क्षेत्रातील काम सक्षमपणे पूर्ण करू शकतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महिला एसटीचालक शीतल शिंदे आहेत.

पहिले स्टेअरिंग पुणे-सिंहगड किल्ला मार्गावर!

सुरुवातीला दीड हजार किलोमीटर एसटी प्रशिक्षण देण्यात आले. महिला चालक २०१९ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर महामंडळाने महिलांना दिलेल्या प्रशिक्षणादरम्यान वळण मार्गावर प्रशिक्षण, घाट चढणे, वळण घेणे, गर्दीतून एसटी चालवण्याचे, रात्रीच्या वेळेस येणारे अडथळे, राष्ट्रीय महामार्गावरील प्रशिक्षण या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले. जुलै २०२४ मध्ये शीतल शिंदे यांच्या हाती पुणे ते सिंहगड किल्ला असे पहिले लालपरीचे स्टेअरिंग देण्यात आले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्या महिला एसटीचालक म्हणून पुण्यात कामावर रुजू आहेत, तसेच महाराष्ट्रामध्ये सोलापूर ते पंढरपूर, धाराशिव, तुळजापूर येथे एसटी चालवित असल्याचे त्यांनी सांगितले.

मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. मी अनेक ठिकाणी काम केले; पण मनाला समाधान वाटले नाही, एक महिला बसचालक म्हणून प्रत्येक व्यक्तीचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, गाव पातळीवर लोकांकडून सत्कार केला जातो, प्रवासांकडून सेल्फी काढली जाते, एक महिला बसचालक म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे निभावते, याचा मला अभिमान आहे. - शीतल शिंदे, महिला एसटीचालक

 

 

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीBus DriverबसचालकWomenमहिलाEducationशिक्षणSocialसामाजिक