शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:08 IST

खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा

पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषण केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच हे उपोषण स्टंटबाजी असल्याचे अप्रत्यक्षरीत्या म्हणत टीका केली. हा केवळ ६०० मीटर च्या रस्त्याचा होता. आमदार आणि खासदार यांना पाच कोटींचा निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. एका मिनिटात रास्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असे अजित पवार म्हणाले. त्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्यत्तर दिले आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी विनम्रपणे सांगू इच्छिते की, या देशातल्या सगळ्याच खासदारांची ही मागणी आहे. जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे. आमचा मतदारसंघ तेवीस लाख लोकांचा आहे. माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली. नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपये त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही. म्हणजे शाळांना पैसे दिले, रस्त्यांना दिलेत. 

खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत. लोकसंख्या वाढायला लागल्यात. त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा. पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का? पाच कोटी रुपयाचा. तो पाच कोटी आम्हाला पुरतच नाही. तुम्ही बारामती लोकसभा मतदार संघाचा हिशोब बघा. तेवीस लाख मतदार नऊ तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर आंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत, एका बाजूला. इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदार संघात पाच लाख रुपये देतात. एवढी महागाई झाली असे समजतात. आम्हाला गडकरी साहेबांचे रस्त्यांसाठी सहकार्य असल्याने त्रास होत नाही.  गडकरी साहेब सगळं करतात. हा रस्ता जिल्हा परिषदचा होता. त्याच्यामुळे या पाच कोटी रुपयामध्ये कुठल्याच खासदाराकडे काही निधी राहताच नाही. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीMONEYपैसा