शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पुण्यात ४.९० लाख वारकरी दाखल; वारकऱ्यांचा हरिनाम गजर आणि एआयच्या मदतीने यशस्वी गर्दी नियोजन

By किरण शिंदे | Updated: June 23, 2025 12:21 IST

एआय प्रणालीद्वारे जमलेल्या आकडेवारीमुळे वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा व्यवस्थापन आणि पोलिस बंदोबस्त अधिक परिणामकारकरित्या राबवता आला

पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात न्हाहून गेलं. एकूण चार लाख नव्वद हजार (४.९० लाख) वारकरी पुण्यात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षिततेसाठी यंदा पुणेपोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक अभिनव पाऊल उचलले.

एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

गर्दीचे व्यवस्थापन आणि संख्येचे विश्लेषण करण्यासाठी यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर करण्यात आला. पुणे पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे आणि विशेष सॉफ्टवेअर बसवले होते. या प्रणालीद्वारे दोन्ही पालख्या शहरात दाखल होण्यापासून ते प्रस्थान होईपर्यंतची प्रत्येक हालचाल टिपली गेली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, "वारीचा प्रचंड जनसागर लक्षात घेता, पारंपरिक उपाय पुरेसे ठरणार नव्हते. त्यामुळे एआयचा वापर करून आम्ही वेळेआधी नियोजन, प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि नंतर विश्लेषण या तीन पातळ्यांवर यशस्वी कामगिरी केली."

वारीतील गर्दीचे अचूक आकडे

२० जून: संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात दाखल – १.९५ लाख वारकरी, ६०० वाहने

२० जून: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दाखल – २.९५ लाख वारकरी, २,००० वाहने

२० व २१ जून: एकत्रित १.५ लाख वारकरी पुढे प्रस्थान

२२ जून: दोन्ही पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान – २.८ लाख वारकरी, १,८०० वाहने

गर्दीचे उत्तम नियोजन आणि वाहतूक सुरळीत

एआय प्रणालीद्वारे जमलेल्या आकडेवारीमुळे वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा व्यवस्थापन आणि पोलिस बंदोबस्त अधिक परिणामकारकरित्या राबवता आला. विशेषतः पालखी मार्गावरील प्रमुख रस्ते, चौक आणि वाहनतळ याठिकाणी गर्दीचा अंदाज घेऊन नियोजन करण्यात आले.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

वारीच्या काळात कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही, ही यशस्वी कार्यवाही पुणे पोलिसांच्या कणखर नियोजनाची आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची साक्ष आहे. वारकऱ्यांनीही शिस्तीने सहभागी होत वारीच्या पारंपरिक भक्तिसंस्कृतीला आधुनिक व्यवस्थापनाची जोड दिली. पुण्यातील ही "डिजिटल वारी" भाविकांच्या श्रद्धेप्रमाणेच स्मार्ट यंत्रणेमुळेही संस्मरणीय ठरली

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpurपंढरपूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPoliceपोलिसArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स