शरद साेनवणेंसह ४०० कार्यकर्ते शिंटे गटात; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जुन्नरला आज प्रवेश होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:04 IST2025-02-28T14:04:08+5:302025-02-28T14:04:44+5:30

शिवनेरीला मंत्रिपद देण्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री यांनी केल्याने दुसऱ्या टप्प्यात नक्कीच मला मंत्रिपद मिळेल

400 activists in eknath shinde group including Sharad Sonwane Junnar will be today in the presence of Eknath Shinde | शरद साेनवणेंसह ४०० कार्यकर्ते शिंटे गटात; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जुन्नरला आज प्रवेश होणार

शरद साेनवणेंसह ४०० कार्यकर्ते शिंटे गटात; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जुन्नरला आज प्रवेश होणार

नारायणगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे सायंकाळी ४:३० वाजता शिवसेना मेळावानिमित्त येत असून, या मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले माजी आमदार माजी आमदार बाळासाहेब दांगट, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे, उद्धवसेना गटाचे नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४०० हून अधिक विविध पक्षांतील कार्यकर्त्यांसह पदाधिकारी यांच्यासह आपण स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती जुन्नरचे अपक्ष आ. शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, राज्यात युती असली तरीही पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढविणार आहोत, अशी ग्वाही आ. शरद सोनवणे यांनी यावेळी दिली. 

आमदार सोनवणे म्हणाले की, भविष्यात शिवजन्मभूमी असलेल्या शिवनेरीला मंत्रिपद देण्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री यांनी केलेले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात निश्चितच पद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून आ. सोनवणे म्हणाले की, आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहोत. तथापि, आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट करून येथे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगर परिषद या निवडणुका राष्ट्रवादीच्या विरोधात लढविण्यात येणार असल्याचे आ. सोनवणे यावेळी स्पष्ट केले.

श्री विघ्नहर कारखान्याने कारखान्याची निवडणूक होत आहे, माघारीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत, सत्यशील शेरकर यांनी पॅनल जाहीर केले असले तरीही शेतकरी संघटनेची चर्चा करून काही जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तथापि संचालक पदासाठी काही बदल करावा, त्यासाठी आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

Web Title: 400 activists in eknath shinde group including Sharad Sonwane Junnar will be today in the presence of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.