शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून क्षमतेच्या वीसपट पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 6:09 PM

यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून क्षमतेच्या वीसपट पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देजमिनीत चांगला ओलावा असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा

पुणे : खडकवासला धरणसाखळीत झालेल्या जोरदार पावसामुळे मुठा नदी अनेकदा दुथडी वाहिली आहे. नदीकाठच्या वसाहती, सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये देखील पाणी गेले आहे. यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून क्षमतेच्या वीसपट म्हणजेच सुमारे ४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खडकवासला धरणसाखळीत टेमघर, वरसगाव, पानशेत ही धरणे येतात. वरसगाव धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १२.८२, पानशेत १०.६५ आणि टेमधरची ३.७१ टीएमसी आहे. तर, खडकवासल्याची उपयुक्त पाण्याची क्षमता १.९७ टीएमसी आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९.१५ टीएमसी आहे. त्यातील १७ ते १८ टीएमसी पाणी पुणे शहर आणि लगतच्या भागाला पिण्यासाठी लागते. तर, उर्वरीत पाणी सिंचन आणि उद्योगाला वापरतात. यंदा जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. धरणातून अनेकदा पाणी सोडावे लागले. त्यामुळे मुठा नदी देखील बऱ्याचदा दुथडी भरुन वाहिली. धरणातील विसर्ग ४५,४७४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. धरणसाखळीत पावसाचा जोर असल्याने ४ ते ८ गस्ट दरम्यान २२.३४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले होते. गेले आठवडाभर धरणक्षेत्रात पुन्हा पावसाने काहीसा जोर धरला आहे. जमिनीत चांगला ओलावा असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे. परिणामी धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासांत टेमघरला ६०, वरसगाव ३८, पानशेत ३९ आणि खडकवासला धरणपाणलोट क्षेत्रात ८ मिलिमीटर पाऊस झाला. सध्या टेमधरमधे ३.६१ टीएमसी (९७.३० टक्के) पाणीसाठा असून, इतर तीनही धरणे शंभर टक्के भरली आहेत. सोमवारी वरसगाव धरणातून १७७६, पानशेत धरणातून ९९० क्युसेक पाणी खडकवासल्यात सोडण्यात आले. त्यामुळे पुढे खडकवासला धरणातून १३,९८१ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. तर, मुठा उजव्या कालव्यातून १ हजार ५४ क्युसेक पाणी सोडण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी