शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

सराईत गुन्हेगारांकडून ४० कारटेप जप्त, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 8:36 PM

पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातून कारटेप, म्युझिक सिस्टिम चोरीला जात असल्याचे व हे गुन्हे ठराविक दिवशी व ठराविक वेळी घडत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने दिशा ठरवून तपास सुुरु केला़.

ठळक मुद्देसर्व जण मुळचे उत्तरप्रदेशातील राहणारे जवळपास १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले़.

पुणे : वाहनांच्या काचा फोडून आतील कारटेप व म्युझिक सिस्टिम चोरणाऱ्या टोळीतील चौघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ४० कारटेप जप्त करण्यात आले आहेत़. साहिल जमील कुरेशी (वय २२, रा़ गोवंडी, मुंबई), अक्लाख हुसेन शेख (वय ३२), मोहम्मद जाहीर लोहार (वय ४१, रा़ तुर्भे, नवी मुंबई) आणि शौकत ईस्माईल कुरेशी (वय ४५, रा़ भेंडीबाजार, मुंबई) अशी चौघांची नावे आहेत़. हे सर्व जण मुळचे उत्तरप्रदेशातील राहणारे आहेत़. याबाबत पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार , पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातून कारटेप, म्युझिक सिस्टिम चोरीला जात असल्याचे व हे गुन्हे ठराविक दिवशी व ठराविक वेळी घडत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने दिशा ठरवून तपास सुुरु केला़. त्यासाठी जवळपास १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले़. त्यात एका मोटार ठराविक दिशेने येऊन गुन्हे करुन जात असल्याचे दिसून आले़. २५ मार्चला विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली़.त्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास एक संशयित मोटार येताना दिसली़.  मात्र ही मोटार भरधाव वेगाने दिघीच्या दिशेने निघून गेली़. तिच्या नंबरवरुन शोध घेतला असता ही गाडी मालकाचे नातेवाईक साहील कुरेशी यांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली़. त्याचा शोध घेत असताना त्याचा साथीदार मोहमंद जाहीद लोहार याला ताब्यात घेतले़. त्याच्याकडे तपास केला असता तो व इतर साथीदार मिळून कारपेट चोरी करीत असल्याची कबुली दिली़.पोलीस शिपाई प्रफ्फुल मोरे आणि सुभाष आव्हाड यांना साहील कुरेशी व अक्लाख शेख यांची माहिती मिळाली़. त्यानुसार ३ एप्रिल रोजी दोघांना सापळा लावून पकडण्यात आले़. कुरेशीकडे गावठी पिस्टल व ६ काडतुसे मिळाली़. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आरोपींकडून चोरीतील एकूण २० कारटेप, म्युझिक सिस्टिम जप्त केले आहे़. ते शौकत कुरेशी याला हे कारपेट विकत असत़ पोलिसांनी त्यालाही अटक करुन त्यांच्याकडून आणखी २० कारटेप जप्त केले आहे़. या चौंघांकडून ४ लाख ६३ हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत़. अधिक तपासासाठी त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे़. ही कामगिरी उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील, दिलीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी केली आहे़.

.......................वडिलही कारपेट चोरीत कोठडीतकारपेट चोरीच्या या गुन्ह्यांमध्ये साहिल कुरेशी हा मुख्य सुत्रधार असून तो इतरांच्या मदतीने शनिवार, रविवारी पुण्यात येत असे़.मुंबईतून पहाटे २ ते ५ यावेळेत येऊन कारपेट, म्युझिक सिस्टिम चोरुन ते पुन्हा मुंबईला परत जात असत़. त्याचे वडिल हे कारपेट चोरीप्रकरणात सध्या गुजरात मधील पोलिसांच्या कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले़. त्यांनी एकूण ४५०  चोºया केल्याचे कबुल करतात़. पण तशी पोलिसांकडे गुन्ह्यांची नोंद आढळून आली नाही़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस