राजगुरूनगरमध्ये खळबळ! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले चार लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 20:13 IST2023-01-13T20:12:29+5:302023-01-13T20:13:35+5:30
या घटनेबाबत खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

राजगुरूनगरमध्ये खळबळ! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले चार लाख रुपये
राजगुरूनगर (पुणे) : चोरट्यांनी दिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपये लांबवल्याची घटना (दि. १२ ) रोजी सिद्धेश्वर नगरी कोर्टाचे पाठीमागे राजगुरूनगर (ता. खेड ) येथे घडली. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला व तिची आजी दुपारी साडेतीन वाजता घरात असताना दरवाजाची बेल चोरट्यांनी वाजविली २५ ते ३० वयोगटातील दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यातील एका चोरट्याने चाकूचा दाखवून फिर्यादीला तुझ्या घरात असलेले सर्व पैसे काढून दे नाहीतर तुला मारून टाकीन अशी भीती दाखवून धमकी दिली. घरातील हॉलमध्ये असलेल्या लाकडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम चार लाख रुपये जबरीने काढून घेतले. फिर्यादीला जाताना म्हणाले तु पोलिसांना कळविले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले करीत आहेत.