कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला 4 दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:09 IST2018-04-04T14:09:34+5:302018-04-04T14:09:34+5:30
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला पोलिसांनी 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला 4 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे- कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला पोलिसांनी 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. शिरुर तालुका न्यायालयात आज मिलिंद एकबोटेला हजर केले असता, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर)ला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला पुणे सेशन्स कोर्टानं 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपत असल्यानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. अखेर आज शिरूर न्यायालयानं त्यांना आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.