शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा ; एसआरपीएफ, होमगार्डची पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 12:53 IST

यंदा वारी सोहळ्यात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. २२ जून रोजी पुण्यात येत असून पुणेपोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली आहे. तब्बल चार हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे वारी होऊ शकली नाही. त्यामुळे यंदा वारी सोहळ्यात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक स्वतः बंदोबस्ताच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहेत.

दोन्ही पालख्यांचे २२ जूनला पुण्यात आगमन होणार असून २२ व २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर व नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत. याठिकाणीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

साध्या वेशातील पोलिसांची गस्त

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा सोनसाखळी चोरटे, मोबाईल चोरटे घेत असतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिलांचा देखील पालखी सोहळ्यात मोठा सहभाग असतो. त्यामुळे साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी त्याचबरोबर दामिनी मार्शलची पथके गस्तीवर ठेवण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखेची पथकेही साध्या वेशात गस्त घालणार आहेत.

- वारकऱ्यांसाठी हेल्पलाईन, ठिकठिकाणी मदतीसाठी बुथ- वॉच टॉवर उभारून त्याद्वारे खडा पहारा- गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स- पालखी मार्गावर आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा- साध्या वेशातील पोलिसांची गस्त- वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त- अन्न औषध प्रशासनाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाची तपासणी- पालखी सोहळा मार्गावर मौल्यवान वस्तू व सुरक्षिततेच्या सूचना देणारे फलक- मार्गालगतच्या गल्ली-बोळात पोलिसांचे मोटारसायकल पेट्रोलिंग- वैद्यकीय सुविधेबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था

पालखी सोहळ्यासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार असून शहर परिसरात विविध पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. चेन स्नॅचिंग, पाकीटमारीच्या घटना रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पालखी कालावधीत वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत असे संदीप कर्णिक (सहपोलीस आयुक्त, पुणे शहर) यांनी सांगितले. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPuneपुणेPoliceपोलिसsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकाराम