भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 01:13 PM2019-08-26T13:13:08+5:302019-08-26T13:14:40+5:30

गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे.

39 crore allotted to the project people of Bhama Askhed | भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप

भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप

Next
ठळक मुद्देपुणे शहराला लवकरच भामा आसखेडचे पाणी मिळणारसर्व कागदपत्रे सादर केल्यास दोन दिवसांत चेक

पुणे : शासनाच्या आदेशानुसार भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी १५ लाख या प्रमाणे पैसे वाटप  सुरु झाले असून, गेल्या चार महिन्यात सुमारे ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य ३७ लाभार्थ्यांचे चेक तयार असून, कौटुंबिक वादामुळे हे चेक घेण्यासाठी कोणी आले नाहीत. तर अन्य सर्व लाभार्थ्यांना फाईल सादर होईल तसे वाटप सुरु आहे. त्यामुळे पुणे शहराला लवकरच भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने भामा आसखेडचे लाभक्षेत्र रद्द करुन धरणातील पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला. परंतु लाभक्षेत्र रद्द केल्यानंतर धरणामध्ये जमिनी केलेल्या शेतकऱ्यांच्या पुर्नवसनाबाबत त्यावेळच्या सरकारने कोणतही भूमिका जाहीर केली नव्हती. यामुळे खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणासाठी २००० मध्ये १ हजार ७०  हेक्टर जमीन संपादित केली होती. या धरणामुळे परिसरातील तब्बल १ हजार ६७३ शेतकरी कुटुंबे बाधित झाले आहेत. यापैकी २०१ शेतकऱ्यांनी शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी यासाठी ६५ टक्के रक्कम भरली होती. त्यानुसार या २०१ खातेदारांना जमीन व पैशांच्या स्वरुपात मोबदला दिला आहे. परंतु जलसंपदा विभाग व पुनर्वसन विभाग यांच्यातील गोंधळामुळे आपल्याला १६/२ च्या नोटीसच देण्यात न आल्याने ३८८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना त्वरित ६५ टक्के रक्कम भरून घेण्यासाठी १६/२ च्या नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गेल्या अडीच-तीन वर्षांत सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु होता. अखेर याबाबत तोडगा काढण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यां ºयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुर्नवसन अधिकाऱ्यांनी खास प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला सादर केला. या प्रस्तावानुसार शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहमतीनुसार प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 
शासनाच्या आदेशानुसार ९ मे २०१९ पासून पात्र लाभार्थ्यांना पैसे वाटप सुरु आहे. यामध्ये एकूण ९०० लाभार्थ्यांपैकी ३६७ शेतकºयांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत शंभर टक्के शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुर्नवसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.
---
एजंटांमुळे पैसे वाटपामध्ये अडचण
गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या बदल्यात जमिन मिळण्यासाठी आंदोलन सुरु असून, बंद पाईपलाईनचे काम बंद करण्यात येत आहे. परंतु धरणाचेलाभक्षेत्र रद्द केल्याने शेतकऱ्यांना जमिन वाटप करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळेच प्रशासनाकडून पैसे वाटप सुरु आहे. परंतु सध्या अनेक एजंट गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटत असून, अधिक पैसे मिळून देण्याची अमिषे दाखवत आहेत. यामुळे सध्या पैसे वाटप करण्यात अडचण येत आहे.
---
सर्व कागदपत्रे सादर केल्यास दोन दिवसांत चेक
भामा आसखेडच्या पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही एजंट अथवा अन्य कोणालाही न भेटत सर्व कागदपात्रासह जिल्हा पुनर्वसन कार्यालयामध्ये अर्ज केल्यास केवळ दोन दिवसांत चेक संबंधित लाभार्थ्यांच्या हाता दिला जाईल. यासाठी मूळ प्रकल्पग्रस्ताने समक्ष येऊन संमतीपत्र, शपथपत्र व ओळखपत्रासाठी आधारकार्ड द्यावे. प्रकल्पग्रस्त मयत असेल तर वारस दाखला दिल्यास संबंधित प्रकल्पग्रस्ताला दोन दिवसांत वाटपाचा चेक देण्यात येईल.

Web Title: 39 crore allotted to the project people of Bhama Askhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.