शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीचे ३८६ काेटी थकले; दाेन वर्षे झाले तरीही रक्कम मिळेना

By प्रशांत बिडवे | Updated: December 17, 2023 17:50 IST

राज्य सरकारने थकविलेल्या रकमेत पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्वाधिक १७४ काेटी ८८ लाख ७४ हजार रूपये एवढे देणे आहे

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या हजारो शिक्षकांचे सेवा उपदान (ग्रॅच्युईटी) व पेन्शन अंशराशीकरण रकमा राज्य शासनाकडे थकीत आहेत. प्राथमिक शिक्षकांना ग्रॅच्युईटीची ३८६ कोटी ७० लाख ९२ हजार रूपयांची रक्कम सरकारकडून येणे बाकी आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून या रकमा थकीत असल्याची माहिती समोर येत आहे. 

राज्य सरकारने थकविलेल्या रकमेत पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्वाधिक १७४ काेटी ८८ लाख ७४ हजार रूपये एवढे देणे आहे. त्यामधील काही शिक्षकांचे तर १२ ते १४ लाखांपर्यंत रकमा थकल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रापाठाेपाठ विदर्भ १४५ कोटी ७८ लाख ६६ हजार रूपये तर मराठवाड्यात ६६ कोटी ३ लाख ५२ हजार इतकी रक्कम दि. ३१ मे २०२३ अखेर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सेवाउपदान स्वरूपात सरकारने देणे बाकी आहे.

पश्चिम महाराष्ट्र पुणे - २७ काेटी २६ लाख, नगर- १४ काेटी २४ लाख, नाशिक - २४ काेटी ८३ लाख, सांगली - १५ काेटी ९१ लाख, काेल्हापूर - १४ काेटी २६ लाख, सातारा - ८ काेटी ३७ लाख, साेलापूर - ६ काेटी ६५ लाख, ठाणे १० काेटी ९१ लाख, पालघर - ४ काेटी १० लाख, रायगड - १५ काेटी ९० लाख, रत्नागिरी - १० काेटी २४ लाख, सिंधुदुर्ग- ४ काेटी २१ लाख, धुळे- ३ काेटी ७८ लाख, नंदूरबार- १ काेटी ९६ लाख, जळगाव- २२ काेटी १९ लाख असे ग्रॅच्युईटीची एकुण १७४ काेटी ८८ लाख रूपये रूपये थकित आहेत.

विदर्भ

 बुलढाणा - १५ काेटी ५० लाख, अकाेला-  ७ काेटी ३५ लाख, वाशीम - काेटी २९ लाख, अमरावती - १४ काेटी ४३ लाख, यवतमाळ- २० काेटी ८६ लाख, वर्धा - ४ काेटी ९५ लाख, नागपूर- ३१ काेटी ६१ लाख, भंडारा- १७ काेटी ३३ लाख, गाेंदिया- ७ काेटी १४ लाख, चंद्रपूर १६ काेटी ४३ लाख, गडचिराेली- २ काेटी ८५ लाख असे एकुण १४५ काेटी ७८ लाख रुपये थकीत.

 मराठवाडा

 छत्रपती संभाजीनगर - ४ काेटी ७३ लाख, बीड- २० काेटी ५८ लाख, नांदेड - १५ काेटी ३८ लाख, लातूर - १२ काेटी ६४ लाख, हिंगाेली ५ काेटी २१ लाख, उस्मानाबाद ३ काेटी ९२ लाख, परभणी २ काेटी २९ लाख आणि जालना ९५ लाख असे एकुण ६६ काेटी रूपये उपदान स्वरूपात शासनाकडून येणे बाकी आहेत.

सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीची ३८६ काेटींची रक्कम थकीत आहे. मे २०२३ नंतर राज्यात सुमारे दोन ते तीन हजार शिक्षक सेवानिवृत्त झाले असतील. या व्यतिरिक्त पेन्शन अंशराशीकरणाची व सातव्या वेतनाचे हप्ते देणे सरकारकडे बाकी आहे. - शिवानंद भरले, समन्वयक, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ

सेवानिवृत्त शिक्षकांची थकीत उपदान रकमेबाबत राज्यशासनाकडे मागणी केली असून शासनाने ती मंजूरही केली आहे. आम्हाला रक्कम प्राप्त हाेताच संबंधित जिल्ह्याला वितरित केली जाईल. - शरद गाेसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीMONEYपैसा