शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

तीस मिनिटांत ३५ वाहनांची नो एंट्रीत घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:07 PM

अर्ध्या तासात केवळ २०० मीटरचा हा वळसा न घालता, ३५ वाहनांनी आपली वाहने नो एंट्रीतून पुढे घातल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देघोले रस्त्यावर २०० मीटरसाठी वर्तुळाकार मार्ग वाहतूक नियमांबाबत पुणेकर बेशिस्त  

अतुल चिंचली/अविनाश फुंदे -पुणे :  शहरातील वाढत्या वाहनांमुळे मोठ्या रस्त्यांना मिळणाऱ्या गल्ली-बोळांच्या तोंडावर अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होताना दिसते़ ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी घोले रोडवर वाहतूक शाखेने या महिन्यापासून वर्तुळाकार वाहतुकीचे नियोजन केले आहे़ केवळ २०० मीटरचा हा वळसा आहे; पण त्यामुळे किमान तीन चौकांतील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे़ असे असले, तरी अर्ध्या तासात केवळ २०० मीटरचा हा वळसा न घालता, ३५ वाहनांनी आपली वाहने नो एंट्रीतून पुढे घातल्याचे ‘लोकमत प्रतिनिधीं’नी केलेल्या पाहणीत दिसून आले़. घोले रस्ता, महात्मा फुले संग्रहालय, आपटे रस्ता चौक मार्ग एमजीएम हॉस्पिटल या मार्गाने वर्तुळाकार वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

घोले रस्त्यालगत असलेल्या छोट्या गल्ल्यांमधून वाहनचालक रस्त्यावर येत असल्याने आपटे रस्ता, घोले रस्त्यावरील वाहतूककोंडी होत असते. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी वर्तुळाकार वाहतुकीचा मार्ग तयार केला आहे. हा वर्तुळकार मार्ग केल्यावर लोकांना माहिती व्हावे, यासाठी काही दिवस पोलीस तेथे थांबले होते; पण आता या व्यवस्थेला काही दिवस झाल्याने लोकांच्या अंगवळणी ही व्यवस्था होईल, या अपेक्षेने येथे वाहतूक पोलीस ठेवण्यात आले नाही़ त्याचा गैरफायदा घेऊन अनेक वाहने उलट दिशेने जाताना दिसतात़ आपटे रस्त्याने (संतोष बेकरी समोरील रस्ता) घोले रस्त्यावर येणाºया वाहनांना डाव्या बाजूला एमजीएम हॉस्पिटलकडे जाता येते. अशा प्रकारे बॅरिकेड लावण्यात आले आहेत; परंतु आपटे रस्त्याने येणारी वाहने घोले रस्त्याकडे जाण्यासाठी एमजीएम हॉस्पिटलकडे जाणे अपेक्षित आहे़ नेहरू सांस्कृतिक भवनाकडे जाण्यासाठी प्रवेश नाकारला असूनही नियमाचे उल्लंघन करून त्या दिशेने जातात. त्यामुळे नेहरू सांस्कृतिक भवनासमोरून आपटे रस्त्याकडे जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. ‘लोकमत’च्या पाहणीतून असे दिसले की, आपटे रस्त्याकडून एकेरी वाहतूक चालू केली आहे. त्या दिशेने अर्ध्या तासाच्या अंतरात २३ वाहने नियमांचे उल्लंघन करताना दिसली. आपटे रस्त्याकडून घोले रस्त्याला जाण्यासाठी दोनशे मीटरचा पट्टा पार करावा लागतो; पण इतकाही वळसा वाहनचालकांना नको आहे़ ते बॅरिकेडच्या कडेने वाहनांच्या प्रवाहाच्या विरुद्ध जातात़. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांनाही धोका निर्माण करताना दिसून येते़. आपटे रस्त्याकडून एमजीएम हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गाने घोले रोडने बालगंधर्व किंवा पुढे फर्ग्युसन रोडकडे जाणे अपेक्षित आहे़ काही वाहने हॉस्पिटलकडे न जाता मध्यातून यू-टर्न मारून पुन्हा महात्मा फुले संग्रहालयाकडे जाताना दिसून आली. महात्मा फुले संग्रहालयाकडून आपटे रस्त्याकडे एकेरी वाहतूक आहे. त्यांना या उलट येणाऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होतो. आपटे रस्त्याने काकडे चौकात येऊन वर्तुळाकार मार्गाने घोले रस्त्याने बालगंधर्व चौकात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फर्ग्युसन रस्त्याकडून येणाºया वाहनांना जर संतोष बेकरीकडे जायचे असेल, तर त्यांना नेहरू सांस्कृतिक भवनाजवळून वळून यावे लागते. हे अंतर अवघे २००  मीटर एवढे आहे; परंतु अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षावाले या वळणाचा कंटाळा करत असल्याचे दिसते़.केवळ अर्धा तास केलेल्या पाहणीत जवळपास ३५ दुचाकीस्वार आणि १५ हून अधिक रिक्षाचालक वाहतूक नियमांना हरताळ फासून, ठरवून दिलेल्या मार्गाने न जाता मध्येच शिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.  बालगंधर्व चौकातून आलेल्या गाड्या वळसा घालून न येता, सरळ मार्गे आल्याने काकडे चौकातून नेहरू संग्रहालयाकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही; तसेच फर्ग्युसन रस्त्याकडून खाली आलेल्या वाहनांनी नेहरू संग्रहालयासमोरून वळून आपटे रोडला जाणे अपेक्षित आहे; परंतु ते काकडे चौकातूनच उजवीकडे वळल्याने समोरून ( संतोष बेकारी कडून) येणाºया वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी निर्माण होत आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी तयार केलेल्या या वर्तुळाकार मार्गात काही जण नियमभंग करत असल्याने इतर वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागतो व त्यातून मुख्य उद्देशाला हरताळ फासला जात आहे़.

घोले रोडवरील वर्तुळाकार मार्ग : वाहतूककोंडी झाली कमी...............

1 आपटे रस्ता (संतोष बेकरी समोर) बॅरिकेड आणि डाव्या बाजूला वळावे व उजच्या बाजूला वळू नये, असे चिन्ह असलेले दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. आपटे रस्त्याने एमजीएम हॉस्पिटलकडे गेल्यावर घोले रस्ता येतो. समोरच बॅरिकेड लावण्यात आले आहे, तर डाव्या आणि उजव्या बाजूला वळावे, असा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे; तसेच नेहरू सांस्कृतिक भवनासमोरून आपटे रस्त्याकडे जाण्यासाठी बॅरिकेड आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. 

......एवढे करूनही दोन बॅरिकेड्सच्या मधून दुचाकी जाताना दिसून आल्या आहेत. पूर्ण वर्तुळाकार वाहतूक मार्ग हा एकेरी वाहतूक मार्ग आहे. वाहतूककोंडी कमी झाली आहे. आपटे चौक, एमजीएम हॉस्पिटल चौक, नेहरू सांस्कृतिक भवन समोरील चौकात एकही वाहतूक पोलीस दिसून येत नाही. दुचाकी, चारचाकी; तसेच रिक्षा सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. दुपारी चारनंतर हे सर्वाधिक पाहायला मिळते. ...............

या रस्त्यांवरील वाहतूक बेशिस्तसंतोष बेकरीकडून उजवीकडे वळण्यास मनाई केली असतानाही त्या ठिकाणी ‘लोकमत प्रतिनिधी’ने केलेल्या पाहणीत केवळ अर्ध्या तासात १७ दुचाकी, ४ रिक्षा आणि २ कार अशा एकूण २३ वाहनांनी ही नो एंट्री मोडून आपली वाहने पुढे दामटली व समोरून येणाºया वाहनांना अडथळा निर्माण केला़ ........फर्ग्युसन रस्त्याने येऊन काकडे चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई केलेली असताना, त्या ठिकाणी अर्ध्या तासात २९ दुचाकी, ६ रिक्षा, नेहरू संग्रहालयाकडून समोर येऊन काकडे चौकातून डावीकडे वळणाºया दुचाकी ७  आणि ९ रिक्षांनी ही चक्राकार वाहतुकीला न जुमानता आपली वाहने मध्ये घातली़ ...शहरात वेगवेगळ्या एकेरी मार्गांवर अशीच परिस्थिती दिसून येते़ विरुद्ध दिशेने वेगाने येणारी ही वाहने नियमांचे पालन करणाºयांसाठी धोकादायक असतात; मात्र आपल्यामुळे स्वत:बरोबरच इतरांनाही इजा होऊ शकते, याचे या वाहनचालकांच्या गावीही नसते़ 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtwo wheelerटू व्हीलर