शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय : एनएफएआयकडील ३१ हजार रिळे नष्ट किंवा गहाळ; कॅगचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:42 IST

चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांसह चित्रपट संबंधित साहित्याचे संवर्धन करणे अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला कॅगच्या अहवालाने चांगलाच दणका दिला आहे.

पुणे - चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांसह चित्रपट संबंधित साहित्याचे संवर्धन करणे अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला कॅगच्या अहवालाने चांगलाच दणका दिला आहे. संग्रहालयाकडील ३१ हजारांपेक्षा अधिक रिळे गहाळ किंवा नष्ट झाली असल्याची माहिती ‘कॅग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे उघड झाली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगने ठपका ठेवल्यामुळे संग्रहालयाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.देशातील चित्रपटाचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र्र सरकारने १ फेब्रुवारी १९६४ रोजी संग्रहालयाची स्थापना केली. देशात केवळ पुण्यात असलेली ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करते. चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांचे जतन व संवर्धन, चित्रपटसाहित्याचे जतन, चित्रपटाबद्दल जागृती वाढवणे हे संग्रहालयाचे प्रमुख काम आहे. चित्रपटांच्या रिळे, व्हिडिओ कॅसेट, डीव्हीडी, पुस्तके, पोस्टर, प्रेस क्लिपिंग, ध्वनिफिती या माध्यमातून १०६ वर्षांचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यात आला आहे.संग्रहालयामध्ये २०१० मध्ये माहिती नोंदविण्याचे (डेटा एन्ट्री) काम सुरू झाले. एकूण तीन लाख सत्तर हजार या संख्येने असलेल्या चित्रपट साहित्याला बारकोड लावण्याचे काम करण्यात आले. २०१६-१७ मध्ये चित्रपटांची १ लाख ३२ हजार रिळे उपलब्ध होती. बारकोड लावण्याचे काम केलेल्या ठेकेदाराच्या बिलानुसार १ लाख ३७७ रिळे उपलब्ध असल्याचे समोर आले.यादरम्यान, ३१ हजार २६३ रिळांचे डबे हरवले किंवा नष्ट करण्यात आले. कॅगने १ मे २०१५ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत संग्रहालयातील साहित्याची तपासणी केल्यानंतर ही तफावत उघड झाली. आधी नोंदवलेली माहिती आणि रिळांची प्रत्यक्षातील संख्या यामधील फरकावरून कॅगने संग्रहालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.संग्रहालयाच्या दुर्लक्षामुळे चित्रपटवारशाचे मोठे नुकसान झाले आहे. आजही चित्रपटांच्या रिळे व इतर साहित्य पोत्यात भरून ठेवल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मूक चित्रपटांच्या महोत्सवासाठी ते पॅरिस येथे गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे