शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्याच्या वानवडीत रात्री टोळक्याकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड; नागरिकांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:55 IST

अज्ञाताने जवळपास 30 ते 40 वाहनांच्या काचा फोडल्या असून घरांवर देखील दगड मारले  

वानवडी : वानवडी गावात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वानवडी गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तसेच ही घटना कोयता गँगने केली आहे की कोणा माथेफेरु व्यक्तिने केली हे समजू न शकल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. वानवडी गावातील खालची आळी, वरची आळी तसेच पालीकेच्या शिवरकर दवाखाना परिसरात रात्री अज्ञात व्यक्तिंनी दुचाकी, तीनचाकी, चारचारकी अशा जवळपास ३० ते ४० वाहनांच्या काचा फोडून दगड मारत तोडफोड केलेली आहे. तसेच घरांवर देखील दगड मारले आहेत.         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीत वाहनांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलीसांनी पहाणी केली असून तेथे असलेल्या एका सीसीटीव्ही कँमेरात सर्व घटना कैद झाली आहे. या घटनेमागे ४ ते ५ व्यक्ती असल्याचे या कॅमेरात दिसून येत आहेत. यामधील संशयित व्यक्तीची ओळख पटली असून पियुष मुरुटे (वय २२) असे त्याचे नाव आहे. गुन्हेगारांचा शोध वानवडी पोलीस घेत असल्याचे वानवडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सांगितले. गावात खालच्या आळीला रात्री, अपरात्री अवैधपणे सुरु असलेल्या धंद्यामुळे गावठाणातील रस्त्यांवर मद्यपींचे वाढते प्रमाण,  जुगार, टवाळखोरांमुळे परिस्थिती बोकाळली आहे. महिला, लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यातूनच अज्ञात व्यक्तिंनी दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची घटना केल्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीसांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपींना अटक करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरीक करत आहेत.

डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी महिलांनी एकत्र येत गुन्हेगारी ला आळा घालण्यासाठी व सीसीटीव्ही कँमेरे बसवण्यासंदर्भातील निवेदन संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानंतर तीनच महिन्यात हि दुसरी मोठी घटना आहे. परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय गावालगत आहे. अवैध धंदे असलेल्या या गावात पोलीस कारवाईसाठी येत असतात तरीही असे प्रकार होत असल्याने नागरीक संशय व्यक्त करून नाराजी व्यक्त करत आहे.   

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcarकारbikeबाईक