तरुणांच्या गाडीतून ३ गावठी पिस्तुलं, २ जिवंत काडतुसे जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:50 PM2021-07-21T16:50:46+5:302021-07-21T16:50:58+5:30

कोंढणपूर फाट्याजवळील घटना, गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेली माहितीवरून सापळा रचून केले अटक

3 village pistols, 2 live cartridges seized from youth's vehicle; The two were handcuffed | तरुणांच्या गाडीतून ३ गावठी पिस्तुलं, २ जिवंत काडतुसे जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या

तरुणांच्या गाडीतून ३ गावठी पिस्तुलं, २ जिवंत काडतुसे जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देदुचाकी आणि शस्त्रे मिळून एकूण १ लाख ५५ हजार २०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने तडीपार गुंड आणि सराईत गुन्हेगार यांच्या कडून ३ गावठी पिस्तुल २ जिवंत काडतुसे व एका दुचाकीसह १ लाख ५५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रोहित विजय अवचरे ( वय २४, रा. पर्वती ) व आदित्य सोपान साठे ( वय २६, रा. पर्वती पायथा ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक मंगळवारी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत दोघे एक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून कोंढणपूर फाटा येथील पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी पथकाने सापळा रचून गाडी वरून आलेल्या अवचरे आणि साठे यांना ताब्यात घेतले.

त्यांची अंग झडती घेतली असता दोघांच्या कंबरेला प्रत्येकी एक गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. तसेच त्यांच्याकडील गाडीची डिक्की तपासल्यावर त्यामध्ये एक गावठी पिस्तुल अशी एकूण ३ गावठी पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. दुचाकी आणि शस्त्रे मिळून एकूण १ लाख ५५ हजार २०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना मुद्देमालासह राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. 

Web Title: 3 village pistols, 2 live cartridges seized from youth's vehicle; The two were handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app