शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

नागरिकांसाठी महसूल विभागाच्या आणखी ३ नव्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 7:14 PM

आता डिजिटल फेरफार, नवीन सातबारा आणि मिळकत पत्रकांचे फेरफार ऑनलाईन मिळणार

ठळक मुद्देआतापर्यंत राज्यातील १ लाख ३६ हजार फेरफार ऑनलाईन करण्यात आले

पुणे : महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या १ ऑगस्ट पासूनच राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या आणखी तीन नवीन ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये आता पर्यंत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध करून देण्यात आला असून, यापुढे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार,  नवीन सातबारा आणि मिळकत पत्रकांचे फेरफार देखील ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या तिन्ही नवीन सुविधांचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा , आठ अ चा उतारा, फेरफार,  प्रॉपर्टी कार्ड फेरफार सहज व विना हेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ऑनलाईन व डिजिटल सातबारा दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येत असून , दिवसाला तब्बल एक लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारे वापरले जात आहेत. या येत्या १ ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीत सातबा-यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होणार असल्याचे या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. 

राज्यात सन २०१५ -१६ पासून ऑनलाईन फेरफार मोहिम सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत राज्यातील १ लाख ३६ हजार फेरफार ऑनलाईन करण्यात आले असून, १ कोटी १८ हजार फेरफार डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. आता हे सर्व फेरफार डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

राज्यात १ ऑगस्ट पासून नवीन सातबारा 

राज्यातील सातबा-यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. नवीन सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबा-याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबार तयार केला आहे. राज्यातील सर्व २ कोटी २५ लाख सातबारे नवीन बदलासह तयार झाले असून, नागरिकांना १ ऑगस्ट पासून नवीन सातबारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मिळकत पत्रकांचे फेरफार ऑनलाईन मिळणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनdigitalडिजिटलMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार