पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत. पुणे शहराच्या मतदारयादीमध्ये ३ लाखांहून अधिक आणि पिंपरी चिंचवड शहरात ९२ हजारांपेक्षा अधिक बोगस मतदार आहेत. या मतदारयाद्या दुरुस्त करून दोषमुक्त कराव्यात आणि मगच निवडणूक घेण्यात यावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांची बुधवारी पत्रकार परिषदेच दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहर प्रमुख संजय मोरे आणि गजनान थरकुडे, माजी सभागृहनेता अशोक हरणावळ, वसंत मोरे, अनंत घरत उपस्थित होते.
अहिर म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दुबार नाव नाेंदणी झाली आहे. मुंबई महापालिकेमध्ये तर महापौरांचे नाव दुबार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भूमिका मांडली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचीही भेट घेतली आहे. मात्र, निवडणूक आयोग जबाबदारी टाळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी, महापालिकांकडे एवढे मनुष्यबळ आहे का, हा मोठा प्रश्न आहे. शहरातील अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत. नाव आणि पत्त्यांमध्ये मोठी तफावत आहे. मतदारयादी अनेक चुका आहेत. त्यामुळे यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये,’ असेही अहिर म्हणाले.
मतदार यादीसंदर्भात केवळ विरोधकच अक्षेप घेत आहेत असे नाही तर महायुतीमधील भाजप व सहकारी पक्षांचेही नेते व पदाधिकारी अक्षेप घेत आहेत. ‘या सर्व घाईगडबडीने सत्ताधारी निवडणुका जाहीर करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उल्हासनगरमधील याद्यांची तक्रार करतात. इतर काही भागातील नेते संबंधीत ठिकाणची सोयीनूसार तक्रार करतात. मात्र, राज्यात सगळीकडे हेच सुरू असताना यावर ते काहीच का बोलत नाहीत. पुण्यात जे सोबत येतील, त्यांना घेवून आम्ही निवडणूक लढविणार आहोत. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेतून इतर पक्षात गेलेले अनेकजण आमच्या संपर्कात आहेत, मात्र अडचणीच्या वेळी जे सोबत राहिले त्यांना प्राधान्य असेल, असेही अहिर यांनी नमूद केले.
संजय मोरे म्हणाले, शहरातील दुबार मतदारांची नावे कशी काढणार, याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही. तशी यंत्रणा नाही. त्यामुळे यावर तोडगा कसा काढणार ते स्पष्ट करावे. गजानन थरकुडे म्हणाले, शहरातील सव्वातीन लाख मतदार दुबार आहेत. त्यामुळे ही छाणनी पुर्ण झाल्याशिवाय निवडणूका घेवू नये.
गणेश मंडळांना दिलेल्या नोटीस मागे घ्या
शहरातील दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो. मात्र, दुसरीकडे मंडळांना नोटीसा दिल्या जात आहेत. वातावरण खराब न करता सरकारने या सर्व नोटीसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणीही अहिर यांनी केली.
Web Summary : Draft voter lists in Pune and Pimpri-Chinchwad contain lakhs of bogus voters. Shiv Sena (UBT) demands corrections before elections, threatening protests. Discrepancies include duplicate names and incorrect addresses, raising concerns about election integrity. Even BJP leaders have raised objections.
Web Summary : पुणे और पिंपरी-चिंचवड की मतदाता सूचियों में लाखों फर्जी मतदाता पाए गए। शिवसेना (यूबीटी) ने चुनाव से पहले सुधार की मांग की है, विरोध प्रदर्शन की धमकी दी है। विसंगतियों में डुप्लिकेट नाम और गलत पते शामिल हैं, जिससे चुनाव की अखंडता पर चिंता बढ़ रही है। भाजपा नेताओं ने भी आपत्तियां जताई हैं।