शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

हगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या ३ खोट्या बँक अधिकाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:45 IST

शशांक हगवणे यानेच तिघांना खोटे अधिकारी बनवून पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

चाकण : हगवणे प्रकरणात तोतया बँक अधिकाऱ्यांची भूमिका उघडकीस आली असून, इंडसइंड बँकेचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी जबरदस्तीने जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कारवाई आज (५ जून) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. योगेश राजेंद्र रासकर (वय २५ वर्षे,रा. तळेगाव ढमढेरे,ता.शिरुर),गणेश रमेश पोतले (वय ३० वर्षे, रा.मोहितेवाडी,ता.खेड),वैभव मोहन पिंगळे (वय. २७ वर्षे,रा.तळेगाव ढमढेरे,ता.शिरूर) याना अटक करण्यात आली आहे. शशांकने या तिघांना खोटे अधिकारी बनवून पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात लता हगवणे व शशांक हगवणे यांच्याविरोधात फसवणूक विश्वासघात आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान इंडसइंड बँकेच्या लीगल टीमने पोलिसांना स्पष्ट केले की, गुन्ह्यातील जेसीबी मशीन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कोणत्याही रिकव्हरी एजन्सीला किंवा प्रतिनिधींना अधिकृत निर्देश दिलेले नाहीत. मात्र, खालील तिघांनी बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली आणि ती आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शशांक हगवणे यानेच त्या तिघांना जेसीबी मशीन ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते. 

वरील तिघांविरुद्ध फसवणूक, गैरवर्तन व बनावट ओळख सादर करून अनधिकृत ताबा मिळविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून वसुली करणाऱ्या टोळ्यांविरोधात कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसMONEYपैसाCourtन्यायालयbankबँक