शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

फुकट्या प्रवाशांकडून २९ लाखांची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 20:37 IST

सुमारे ९ हजार ९०० प्रवाशांना प्रत्येकी ३०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे...

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात सर्वाधिक ७ लाखांची दंडवसुली पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नियमितपणे बसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी

पुणे : बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून मागील पाच महिन्यात सुमारे २९ लाख ८२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. सुमारे ९ हजार ९०० प्रवाशांना प्रत्येकी ३०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ७ लाखांची दंडवसुली झाली होती.पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून नियमितपणे बसमध्ये प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाते. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहे. यामध्ये एकुण १२ तिकीट तपासणीसांचा समावेश आहे. ही पथके दोन सत्रांमध्ये बसमध्ये तसेच बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांची तिकीटे तपासतात. त्यामध्ये विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तसेच अन्य मार्गाच्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात येते. त्यांच्याकडून प्रत्येकी ३०० दंड वसुली केला जातो. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात ४ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. एकुण १६४८ प्रवाशांना पकडण्यात आले होते. मागील पाच महिन्यांतील ही सर्वात कमी दंडवसुली राहिली.सर्वाधिक फुकटे प्रवासी जानेवारी महिन्यात पकडण्यात आले. सुमारे २ हजार ३०० प्रवाशांकडून ७ लाख २ हजार ७०० प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर फुकट्या प्रवाशांमध्ये घट होत गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. फेब्रुवारी महिन्यात ही वसुली ६ लाख ५६ हजार, मार्च महिन्यात ५ लाख ७६ हजार तर एप्रिल महिन्यात ५ लाख ५१ हजारांपर्यंत खाली आली. मे महिन्यामध्ये सर्व तिकीट तपासणींवर इतर कामांची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. बसवरील मार्ग फलकांची तपासणी, बस वेळेवर मार्गस्थ करण्यासाठी आगारांमध्ये भेटी, रद्द फेºया कमी करण्यासाठी पाठपुरावा, बसस्थानकांवर गाड्यांची तपासणी या कामांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्यात तुलनेने कमी कारवाई झाल्याचे ‘पीएमपी’तील अधिकाºयांनी सांगितले.--- फुकट्या प्रवाशांकडून करण्यात आलेली दंडवसुलीमहिना        फुकटे प्रवासी    दंडवसुलीजानेवारी    २३४२        ७,०२,७००फेब्रुवारी    २१८९        ६,५६,८००मार्च         १९२०        ५,७६,२००एप्रिल        १८३८        ५,५१,६००मे        १६४८        ४,९४,४०० 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलMONEYपैसा