शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जखडून बांधून ठेवलेल्या २९ जनावरांना मिळाले जीवनदान; कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या नराधमांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 16:42 IST

बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पोत व गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांना गोठ्यावर पोलिस व गोरक्षकांच्या मदतीने जीवनदान देऊन सुटका करण्यात आली आहे

सांगवी (बारामती) : बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पोत व गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांना गोठ्यावर   पोलिस व गोरक्षकांच्या मदतीने जीवनदान देऊन सुटका करण्यात आली आहे. रुषिकेश प्रभाकर देवकाते (वय २६) रा.निरावागज,(ता. बारामती.जि.पुणे) यांनी बारामती पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक साकीब जावेद कुरेशी( वय २०, रा. म्हाडा कॉलनी गुणवडी रोड,ता.बारामती), टेम्पो चालक समीर सैपन शेख (वय २२ रा. मेखळी, ता.बारामती), बिलाल राजा शेख (वय २०, रा. निरावागज,ता.बारामती), उस्मान  शेख,(वय२० ,रा. सरडे ,ता.फलटण), युसूफ सैपन शेख (वय२४ ,रा.सरडे,ता.फलटण ) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांनी छापा टाकल्यावर काळ्या -पांढऱ्या रंगाच्या १३ जीवंत जर्सी गाई, तसेच सदर टेम्पो शेजारील गोठयातील ९ देशी बैल,२ जर्सी बैल,५ जर्सी गाई अशी एकुण २९ जनावरे दाटीवाटीने कोंबुन बांधलेली होती. सदर जनावरांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ती सर्व जनावरे अशक्त व भुकेने व्याकुळ झालेली होती. सदर जनावरांबाबत साकीब जावेद कुरेशी यास विचारणा केली असता ती गोठयातील जनावरे आमचीच असुन ती कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. एक  टेम्पो, १ लाख ३० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ११ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले.

सोमवार (दि. १३ ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगवी (ता.बारामती)  येथील खंडोबानगर येथे काही अज्ञात परीरातील जनावरे एकत्र गोळा करून एका वाहनामध्ये भरून घेवून जाणार असल्याची माहिती गोरक्षक रुषिकेश देवकाते यांना मिळाली होती. त्यानंतर गोरक्षक हर्षद बबन देवकाते, महेश संभाजी पवार, नानासो माने,(रा. सुरवडी, ता.फलटण,जि.सातारा ) तसेच युवराज पांडूरंग डाळ,( रा.निरावागज, ता.बारामती)  हे सांगवी येथील चांदणी चौक येथे एकत्र येऊन जनावरांबाबत पोलिसांना माहीती देऊन दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस व गोरक्षक हे गोपाळ तावरे यांच्या शेतातील गोठयाजवळ खात्री करण्यासाठी गेले. यावेळी तेथे एका टेम्पो हा संशयितरित्या थांबलेला आढळला. त्यावेळी टेम्पोला बाहेरून ताडपत्री लावून दोरी बांधत असलेल्या पाच जणांकडे विचारपूस केली. यावेळी पाहणी केल्यावर त्यामध्ये जनावरे  हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आली. सदर जनावरे दाटीवाटीने कुरपणे, रस्सीने जखडून बांधून ठेवली होती. जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची सोय केलेली नव्हती. दरम्यान त्यांचे मेडीकल केल्याचे प्रमाणपत्रे तसेच  कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. असे नमूद फिर्यादीत म्हटले आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार शशिकांत वाघ, आर.जे.कानगुडे,पोलिस नाईक राजेंद्र काळे, रावसाहेब गायकवाड, दत्तात्रय चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे, प्रशांत रावत यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिसcowगायCrime Newsगुन्हेगारी