शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्य दलातून ५ दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:38 IST

गेल्या दोन वर्षापासून जवान हा जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) या पदावर कार्यरत होता

तळेघर : भारतीय सैन्य दलातून पाच दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या सत्तावीस वर्षीय जवानाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले सुभाष अनिल दाते (वय२७ वर्ष) हा तरुण जम्मू काश्मीर या ठिकाणी बॉर्डर रोडस आॅर्गनायझेशन (बी.आर. ओ.) ह्या मध्ये ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) ह्या पदावरती कार्यरत होते. 

आई वडीलांच्या मतभेदामुळे जवान सुभाष अनिल दाते हे लहानपणापासूनच मामाच्या गावी राजपुर या ठिकाणी होते. तसेच त्यांचे शिक्षण देखील याच ठिकाणी झाले होते. यांचा सांभाळ मामा चंदू सदू लोहकरे आणि आई सुमन अनिल दाते यांनी केला. सुभाष यांनी प्राथमिक शिक्षण राजपुर येथे घेतले तर पुढील बारावीपर्यंत शिक्षण त्यांनी शिनोली येथे पूर्ण घेतले. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे आयटीआय चा कोर्स पूर्ण केला. आयटीआयचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर  मामाच्या गावी परत आले आणि मामा, आई, मावशी व स्वतःच्या इच्छेनुसार देशाची सेवा करावायची म्हणून सुभाष दाते यांनी मनात इच्छा बाळगली.  आणि त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याची तयारी सुरू केली. मनामध्ये इच्छा जिद्द आणि चिकाटी च्या जोरावती ते जम्मू काश्मीर येथे बॉर्डर रोडस आॅर्गनायझेशन (बी.आर. ओ.) ह्या मध्ये ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.)  सुपरवायझर या पदावर भरती झाले. आणि स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे स्वप्न साकार करून ते देश सेवेसाठी रुजू झाले. गेले दोन वर्षापासून दाते हे जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.)ह्या पदावर कार्यरत होते. मात्र त्यांना पुढील परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने सुभाष दाते यांनी पाच दिवसांची रजा घेऊन आपल्या मामाच्या गावी राजपुर ह्या ठिकाणी आले होते.       बुधवार दि.३० रोजी सुभाष हे झोपेतून उठले असता त्यांच्या छातीत अचानक दुखण्यास सुरु झाल्याने त्यांची आई सुमन दाते यांनी शेजारी राहणारे तुकाराम फलके यांना बोलावून  सुभाष याच्या छातीमध्ये खूप दुखू लागण्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ तळेघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी घोडेगाव येथे पाठवले. डॉक्टरांनी पाहणी केली असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मंचर येथे शवविच्छेदन करुन राजपूर या ठिकाणी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. सुभाष दाते हे शांत मनमिळावु स्वभावाचे होते. ते नेहमी एकमेकाच्याला मदतीला धावत असत त्यांच्या मृत्यूनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आदिवासी भागातून मोठा जनसमुदाय समाजाला होता अनेकांचे अश्रू अनावर झाले.         या वेळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार नायब तहसीलदार शांताराम किर्वे पोलिस पाटील उत्तम वाघमारे सतिश भोते तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथील सन्मान गार्ड पथक व परिसरातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटकाhospitalहॉस्पिटलJammu Kashmirजम्मू-काश्मीरForceफोर्स