हॉटेल रिझर्वेशनचे काम देऊन महिलेची २६ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 23, 2023 18:34 IST2023-10-23T18:33:46+5:302023-10-23T18:34:09+5:30
हॉटेल बुकिंगसाठी वेगवगळे असाइनमेंट देऊन फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली

हॉटेल रिझर्वेशनचे काम देऊन महिलेची २६ लाखांची फसवणूक
पुणे : पैश्यांची गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार टिंगरेनगर परिसरात घडला आहे. हॉटेल बुकिंगसाठी वेगवगळे असाइनमेंट देऊन फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० ऑगस्ट २०२३ पासून ते २२ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान घडला आहे. याबाबत टिंगरेनगर परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कदम यांना अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. सांगितलेले काम पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यांनतर कदम यांना टेलिग्राम ग्रुपवर ऍड करून ऑनलाईन हॉटेल बुकिंग करण्याचे काम सांगण्यात आले. काही दिवसांनंतर कदम यांना काही पैसे गुंतवले तर त्यावर नफा मिळवून देतो असे सांगितले. कदम यांचा विश्वास बसून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ५ लाख १२ हजार ४४८ रुपये भरले. मात्र जमा केलेल्या रकमेचा मोबदला न मिळाल्याने कदम यांनी विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक संगीता पाटील या करत आहेत.