शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला प्रकल्पात २३ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 20:44 IST

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील नद्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणांतील साठ्यात वेगाने वाढ

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, तुरळक पावसाच्या सरींमुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे परिसरात २, माणिकडोह ५, डिंभे, कळमोडी ७, भामा आसखेड १४, वडीवळे ४०, आंद्रा ८, पवना १२, मुळशी ३८, टेमघर ३०, वरसगाव १९, पानशेत १७ आणि खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी परिसरात १३ आणि टेमघरला १० मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणात २.४९ (६७.०९ टक्के), वरसगाव ८.४८ (६६.११ टक्के), पानशेत ९.९७ (९३.६६ टक्के) आणि खडकवासला धरण क्षेत्रात १.९७ टीएमसी (१०० टक्के) आहे. या चारही धरणात मिळून २२.२१ टीएमसी (७८.५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात चारही धरणांत मिळून १६.९९ टीएमसी पाणीसाठा होता. सायंकाळी पाच पर्यंत खडकवासला धरणातून सायंकाळी पाच पर्यंत २ हजार ५६८ आणि सायंकाळी सात नंतर ४ हजार २८० क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. डिंभे धरणांत ९.०७ (७२.५९ टक्के), कळमोडी १.५१ (१०० टक्के), चासकमान ७.३४ (९६.९० टक्के), भामा आसखेड ५.७१ (७४.४६ टक्के), पवना ७.३५ (८६.३५ टक्के) आणि मुळशी धरणांत १५.०२ (८१.३८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी २.२९ (६२.०२ टक्के), निरा देवघर ८.५८ (७३.१४ टक्के), भाटघर १६.८१ (७१.५४) आणि वीर धरणात ८.७७ (९३.२२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान खडकवासला धरणापाठोपाठ येडगाव धरणातून ६६४, कळमोडी ६२८, चासकमान ५ हजार २७५, वडीवळे १ हजार ४५, कासारसाई पाचशे आणि मुळशी धरणातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील नद्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणांतील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. उजनीतील उपयुक्त पाणीसाठा १०.११ टीएमसीवर (१८.८७ टक्के) गेला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणीUjine Damउजनी धरण