शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

खडकवासल्यातून २१ हजार क्युसेक्सने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 09:40 IST

शुक्रवारी रात्री ८ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २० हजार ६९१ क्युसेक्सनेविसर्ग सोडण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देनदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा :महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; मुठा खोऱ्यांमध्ये जोरदार पाऊसपानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस

पुणे : सध्या मुठा खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणासह पानशेत धरणदेखील शंभर टक्के भरले आहे. यामुळेच खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री आठ वाजता २० हजार ६९१ क्युसेक्सने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास रात्री विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुठा खोऱ्यामध्ये प्रामुख्याने पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पानशेत धरणातूनदेखील पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २० हजार ६९१ क्युसेक्सनेविसर्ग सोडण्यास सुरुवात केली. यामुळे शहराच्या कोणत्याही भागात पाणी शिरणार नसले तरी रात्री विसर्ग वाढविल्यास सिंहगड रोड, गरवारे कॉलेजजवळील खिलारे वस्ती, ओकारेश्वर परिसर, येरवडा, ढोले-पाटील रोड परिसरामध्ये प्रामुख्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खडकवासला धरणातून २१ हजार क्सुसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असला तरी अद्याप हा धोक्याचा विसर्ग नसून, नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले. .................

भिडे पूल पाण्याखाली जातो - १८०००गरवारे कॉलेजजवळील खिलारे वस्तीत पाणी शिरते - २८०००कामगार पुतळा, शिवाजीनगर -३००००शितळादेवी मंदिर (डेक्कन) पाण्याखाली जाते- ३३०००पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना - ३५०००तोफखाना, शिवाजीनगर, पीएमटी टर्मिनल्स, डेक्कन- ४००००शिवणे नदी लगतचा भाग- ५००००पुणे मनपाजवळील नवीन पूल-५४०००पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते- ६०००० 

टॅग्स :PuneपुणेDamधरणmula muthaमुळा मुठाWaterपाणीRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका