Pune Corona News: पुणे शहरात मंगळवारी २०८ जणांची कोरोनावर मात; तर २४३ कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 19:33 IST2021-08-31T19:33:26+5:302021-08-31T19:33:40+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८४० संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: पुणे शहरात मंगळवारी २०८ जणांची कोरोनावर मात; तर २४३ कोरोनाबाधित
पुणे : शहरात मंगळवारी २४३ कोरोनाबाधित आढळून आले असून, २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८४० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.०९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २६५ इतकी आहे. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ३३ हजार ३११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९५ हजार ५८६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८४ हजार ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९२६ जणांचा मृत्यू झाला आहे.