Influenza Virus: राज्यात वर्षभरात इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाचे २०३९ रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: December 10, 2023 04:22 PM2023-12-10T16:22:06+5:302023-12-10T16:23:06+5:30

इन्फ्लूएंझा विषाणूची लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया

2039 cases of influenza outbreak in the state during the year 8 people died | Influenza Virus: राज्यात वर्षभरात इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाचे २०३९ रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

Influenza Virus: राज्यात वर्षभरात इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाचे २०३९ रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

पुणे: यावर्षी फेब्रुवारी महिन्यात उद्रेक झालेल्या 'एच ३ एन २' हा इन्फ्लूएंझा विषाणू 'ए' याचा उपप्रकाराचे राज्यात वर्षभरात २०३९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे व पुण्यात या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान यावर्षी जून दरम्यान याची रुग्णसंख्या वाढली असली तरी मृत्यू घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

'एच ३ एन २' हा इन्फ्लूएंझा विषाणू प्रथम १९६८ मध्ये माणसांमध्ये आढळला असून तेव्हापासून त्याचा प्रसार जगभरात होत आहे. यावर्षाच्या सुरवातीला या आजाराचा पुण्यात माेठया प्रमाणात प्रसार झाला हाेता. याची लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया इ. आहेत. यावर लक्षणानूसार उपचार करण्यात येतात.

इन्फ्लूएंझा विषाणु हे श्वसनविषयक (रेस्पिरेटरी व्हायरस) असून त्यांचा प्रसार हवेद्वारे होतो. हा हंगामी (सिझनल) इन्फ्लूएंझा असून प्रत्येक सिझनमध्ये एक किंवा दोन विषाणू हे आधीच वातावरणात प्रबळ असलेल्या विषाणूंसोबत त्याचा प्रसार होतो. ही नेहमीची बाब आहे. लक्षणे काेविडसारखी असली तरी कोविडचा विषाणू आणि 'एच ३ एन २' यांचा थेट संबंध नाही. परंतु, दोन्ही विषाणू श्वसन विकाराला कारणीभूत ठरतात. त्यांचा संसर्ग झाल्यानंतर ताप, खोकला व थकवा अशी लक्षणेही मात्र सारखीच दिसतात.

जूनअखेर रुग्णसंख्या वाढली पण मृत्यू घटले

यावर्षी जूनअखेर या विषाणुचे रुग्ण वाढले असले तरी त्यांचा मृत्यू मात्र कमी झालेले आराेग्य खात्याच्या आकडेवारीवरून समाेर आले आहे. यावर्षी जानेवारी ते ३१ मे दरम्यान राज्यात एच३ एन२ चे ५१८ रुग्ण आढळले आणि त्यापैकी ७ जण दगावले. तर, जून ते ८ डिसेंबरदम्यान १५२१ रुग्ण आढळले असून केवळ एकच मृत्यूची नाेंद झाली आहे.

'एच ३ एन २' याच्या संसर्ग होण्यापासून बचाव कसा करायचा?

- हे रेस्पिरेटरी व्हायरस आहेत. हातांची स्वच्छता, कोरोना सुसंग वर्तणूक, मास्कचा वापर, सामाजिक अंतर या उपाययोजना संसर्गापास बचाव करण्यासाठी आहेत.

दि. १ जानेवारी ते ८ डिसेंबर अखेर 

बाधित रुग्ण इन्फलुएंझा ए (एच३ एन२) – २०३९
सद्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण – ७
मृत्यू (एच३ एन२) – ८

Web Title: 2039 cases of influenza outbreak in the state during the year 8 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.